पुष्कर जोग आणि पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात झळकणार, गाण्याचा धमाकेदार टीझर प्रदर्शित !
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पुष्कर जोग आणि ‘अल्याड पल्याड’ चित्रपट तसेच बंजारा गाण्यांमध्ये दिसणारी सुंदर अभिनेत्री पूजा राठोड यांचे नवीन वर्षात ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान लव्ह साँग प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. गाण्याची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या गाण्याची चर्चा आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे.
अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोडचा काल पोस्टर रिलीज झाल्यानंतर काही तासांपूर्वीच आता गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोडने या दोघांनीही सोशल मीडियावर ‘बायडी’ गाण्याचं टीझर शेअर केला आहे. ‘बायडी’ गाण्याच्या टीझरमध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे गाण्याच्या टीझरने चाहत्यांची उत्कंठा वाढलेली आहे. टीझरमध्ये प्रेक्षकांना फक्त म्युझिकंच ऐकायला मिळत असून टीझरच्या शेवटी “तु माझी बायडी होशील का?” असं लिरिक्स ऐकू येतंय.
‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. तर गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी वावरे यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. बायडी गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
शेअर केलेल्या गाण्याच्या टीझरमध्ये, पुष्कर एका वृत्तपत्र वाटणाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर पूजा राठोड एका सामान्य महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. दोघांच्याही भूमिकेचे, अभिनयाचे आणि लूकचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. पुष्करने या आधी बिग बॉस मराठी हा रिॲलिटी शो तसेच तू तू मै मै, वचन दे तू मला, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या टेलिव्हिजन मालिका आणि वेल डन बेबी, जबरदस्त, ती आणि ती, बापमाणूस, मुसाफिरा असे अनेक मराठी हिंदी चित्रपट केले आहेत. तर अभिनेत्री पूजा राठोड हिने अल्याड पल्याड चित्रपट आणि विशेष म्हणजे तिची सोनेरो भुरिया, सोकेवलो साडो, नीलो कालो फेटिया अशी बरीच बंजारा गाणी प्रसिद्ध आहेत.