फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 चा फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसे मनोरंजन वाढत आहे. त्याचबरोबर बिग बॉस स्पर्धकांसाठी आणखीनच खेळ कठीण करून नवनवे ट्विस्ट खेळामध्ये आणत आहे. सध्या करणवीर मेहरा अधिकच चर्चेत येऊ लागला आहे. यामागे त्यांच्यातील वाद आणि निरुपयोगी मुद्दे आहेत. लोकांनाही करणवीरचे वागणे आणि वागणूक बऱ्याचदा आवडत नाही परंतु घरामध्ये सर्वाधिक चर्चेत आणि विजेता होण्याच्या यादीमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. आता अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये करणवीर आणि चाहत पांडे यांच्यात भांडण होत आहे. करणवीरने चाहतच्या बॉयफ्रेंडबद्दल असे काही बोलले की ती संतापली.
Bigg Boss 18 : फिनालेपूर्वी फॅमिली वीकमुळे या 5 स्पर्धकांचा खेळ बिघडला, कुटूंबियांनी वाढवल्या अडचणी
करणवीर मेहराची वागणूक दिवसेंदिवस खराब होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये करणवीर मेहराने चाहत पांडेच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि तिच्या प्रियकरावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वास्तविक चाहत शिल्पा शिरोडकर, श्रुतिका आणि सर्व महिला गटाशी बोलत होते ज्यामध्ये करणवीर घुसला आणि दोघांमध्ये भांडण झाले.
चाहत पांडे शिल्पाला सांगत होती की, शिल्पा जी, तिने जे काही कमावले आहे ते रक्त आणि घामाचे फळ आहे. या प्रकरणी करणवीरने प्रवेश केला आणि सांगितले की, इतके काम करूनही तुमच्या मित्राला ऍनिव्हर्सरी दिवस साजरा करण्यासाठी वेळ मिळाला. या प्रकरणावर चाहत म्हणते की, तिचे टेन्शन घेऊ नका. दोघांमधील संभाषण इतके वाढले की चाहत पांडेने करणवीरच्या अंगावर गोष्टी फेकण्यास सुरुवात करतात. चाहत इतकी चिडली की ती रागाने रडू लागली आणि म्हणाली, करण, इथून निघून जा.
Karan Veer ne kiya aisa comment bhadak gayi Chaahat in a moment. 🫣
Dekhiye #BiggBoss18, aaj se Mon-Fri raat 10:30 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic #GoCheese#BiggBoss18 #BiggBoss #BB18… pic.twitter.com/Ox58ynvjVZ
— ColorsTV (@ColorsTV) January 6, 2025
करणवीर मेहराला त्याच्या असभ्यपणामुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आता या व्हिडिओमुळे करण पुन्हा एकदा यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. एका यूजरने लिहिले – ज्या पुरुषाला २ बायका आहेत तो बोलत आहे. दुसऱ्याने लिहिले – गरीब व्यक्ती, तो स्वतः त्याचे लग्न वाचवू शकला नाही. तिसऱ्याने लिहिले- मला वाटते की आजकाल करणवीर मेहरा अधिक स्मार्ट होत चालला आहे. चौथ्याने लिहिले- आता करण पूर्णपणे नकारात्मक दिसत आहे.
आगामी भागामध्ये नॉमिनेशन होणार आहे यामध्ये बिग बॉस घरातल्या सदस्यांना नवा धक्का देणार आहे. यावेळी टास्कमध्ये केलेली चूक स्पर्धकांना महागात पडणार आहे.