akshaya deodhar makar sankranti black saree look
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे राणादा आणि पाठकबाई अर्थात हार्दिक जोशी (Hardik Joshi) व अक्षया देवधर(Akshaya Deodhar) ही जोडी लोकप्रिय झाली. हार्दिक आणि अक्षयाने २ डिसेंबरला लग्न केलं. अक्षया व हार्दिक सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती, तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता या दोघांची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरी होत आहे. या संक्रांतीच्या अक्षयाच्या (Akshaya Deodhar Sankranti Video) लूकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हार्दिक व अक्षया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. दोघेही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचा काळ्या साडीतील एक व्हिडीओ अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अक्षयाने काळी काठपदराची सोनेरी किनार असलेली सुंदर साडी, नाकात नथ आणि गळ्यात मोत्यांची माळ, मंगळसूत्र घातलं आहे. तसेच केसात तिने गजरादेखील माळला आहे. ‘सुख कळले’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
[read_also content=”लोकलच्या दारात प्रवास करताना एकाने तरुणीचा हिसकावला मोबाईल; पाठलाग करण्यासाठी प्लॅटफार्मवर मारली उडी, तरुणी जखमी! https://www.navarashtra.com/maharashtra/girl-jumps-off-train-to-chase-phone-snatcher-in-mumbais-andheri-station-injured-nrps-361618/”]
दरम्यान, अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहते तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. ‘पाठकबाई खूपच सुंदर दिसत आहात’, ‘पाठकबाई छान दिसत आहात’, ‘तुमची साडी खूप सुंदर आहे’, अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. मकर संक्रांतीनिमित्त होम मिनिस्टर शोमध्ये हार्दिक आणि अक्षयाची जोडी पैठणीसाठीचा खेळ खेळताना दिसणार आहे.