आयफा पुरस्कार सोहळा ( IIFA 2023) हा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम 25 मे रोजी अबुधाबीमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तीन दिवस चाललेला हा कार्यक्रम 27 मे रोजी संपला. यासोबतच विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात आलिया भटला गंगुबाई काठियावडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि विक्रम वेधासाठी हृतिक रोशनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. यासोबतच आता आता IIFA पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची यादी समोर आली आहे. चला जाणून घ्या विजेत्यांची नावं
[read_also content=”सगळं गाव शोधत होतं मुलीला, पण पाळीव कुत्र्याला लागाला सुगावा; असं शोधून काढलं बेपत्ता चिमुकलीला https://www.navarashtra.com/crime/pet-dog-found-the-place-where-the-dead-body-of-the-owners-daughter-was-buried-nrps-405498.html”
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणून ओळखला जाणारा ‘आयफा 2023′ (International Indian Film Awards 2023) पुरस्कार सोहळा हा अबू धाबीतील एका बेटावर पार पडला. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि विकी कौशलने (Vicky Kaushal) होस्ट केला होता. या पुरस्कार’ सोहळ्यात आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) आणि ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. ‘आयफा 2023’मध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमातील अभिनयासाठी आलियाला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या सिनेमासाठी हृतिक रोशनला (Hrithik Roshan) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. तर सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेते कमल हासन यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमा : दृश्यम 2 (Drishyam 2)
सर्वोत्कष्ट एडिटिंग : दृश्यम 2
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर माधवन (रॉकेट्री : द नंबी इफेक्ट) (R. Madhavan Rocketry: The Nambi Effect)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (Alia Bhatt) (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : हृतिक रोशन (Hrithik Roshan) (विक्रम वेधा Vikram Vedha)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मौनी रॉय (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जिओ)
सर्वोत्कृष्ट कथानक : डार्लिंग्स (परवेज शेख आणि अभिषेक पाठक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री : खुशाली कुमार (धोखा अराउंड द कॉर्नर)
सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष : शांतनु माहेश्वरी (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट : वेड
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : श्रेया घोषाल (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : अरिजीत सिंह (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य (ब्रह्मास्त्र – केसरिया)
सर्वोत्कष्ट पटकथा : गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संवाद : गंगूबाई काठियावाडी