अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, तब्बल साडेतीन तास चौकशी; हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. केव्हा कमाईमुळे तर केव्हा वादांमुळे चित्रपट चर्चेत राहिला आहे. हैद्राबादमध्ये झालेल्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये जीवनाशी झुंज देतोय. चेंगराचेंगरीचे संकेत मिळताच अल्लू तिथे आला होता पण दुसऱ्या दिवशी त्याला प्रकरणाचे गांभीर्य कळले. अभिनेत्याला काल (२३ डिसेंबर) रोजी पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस मिळाली होती, त्यानंतर अभिनेता आज (२४ डिसेंबर) चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला होता.
‘पुष्पा २’च्या वादग्रस्त घडामोडीनंतर दिग्दर्शकांचा धक्कादायक निर्णय, सुकुमार नेमकं काय म्हणाले ?
हैद्राबादच्या चिकडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अल्लू अर्जुनची तब्बल पावणे चार तास चौकशी केली.. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांचे अभिनेत्याने उत्तरं दिले. आजची चौकशी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्याला चौकशीसाठी चिकडपल्ली पोलिस बोलवण्याची शक्यता आहे. आवश्यकता भासल्यास अभिनेत्याला पुन्हा चौकशीसाठी यावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले. अल्लू अर्जुननेही पोलिसांना सहमती दर्शवली असून, त्याला पुन्हा बोलावल्यास पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. अभिनेत्याची आज सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजल्यापासून ४५ मिनिटांपर्यंत चौकशी सुरु होती.
१५ इतिहासकार, तब्बल २५ लेखक अन् नेहरूंचं पुस्तक; श्याम बेनेगल यांनी असा बनवला ‘भारत एक खोज’टीव्ही शो
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनची चौकशी सेंट्रल झोनचे डीसीपी अक्षांश यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाकडून करण्यात आली. चौकशीवेळी अभिनेत्याला पोलिसांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील महिलेच्या मृत्यूची माहिती होती का ? याप्रश्नावर अभिनेत्याने त्याला महिलेच्या मृत्यूची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाल्याचे सांगितले. अल्लू अर्जुनचा बाऊन्सर अँथनीला धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चौकशी झाल्यानंतर अभिनेता तीन वाजल्याच्या सुमारास घरी गेला. अभिनेत्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. शिवाय, गरज भासल्यास अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये नेऊन सीन रिक्रिएशन करण्याची शक्यता आहे.
थिएटर मॅनेजमेंटने अभिनेत्याला थिएटरमध्ये न येण्यासाठी आधीच सांगितलं होतं का ? आपल्याला थिएटरमध्ये जाण्याची पोलिसांची परवानगी नाही, ही माहिती अभिनेत्याला माहिती नव्हती का ? थिएटरमध्ये प्रीमियरदरम्यान उपस्थित राहण्यासाठी अल्लूने थिएटर मॅनेजमेंटची परवानगी घेतली होती का ? आणि जर घेतली असेल तर त्याची प्रत अभिनेत्याकडे आहे का ? अल्लू अर्जुन आणि त्याच्या सोशल मीडिया टीमने (PR) पोलिसांची अधिकृत परवानगी घेतली होती का ? थिएटरमधील आणि त्याच्या आजुबाजूच्या परिस्थितीबद्दल अभिनेत्याला त्याच्या पीआर टीमने आधीच माहिती दिली होती का ? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात हैद्राबाद पोलिस सध्या आहेत. पोलिसांना या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आणखी काय माहिती समोर येतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.