फोटो सौजन्य - Social Media
अल्लू अर्जुन अभिनीत ‘पुष्पा 2’ सध्या जास्त चर्चेत आहे. 05 डिसेंबर 2024 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. कोणताही भारतीय चित्रपट त्याची बरोबरी करू शकत नाही, परंतु 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मुफासा: द लायन किंग’ या अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपटाने त्याची स्थिती निश्चितच कमकुवत केली आहे. ख्रिसमसच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत पुष्पराज ‘मुफासा’च्या गर्जनापुढे नतमस्तक होताना दिसत आहेत.
‘मुफासा’ पाहण्यात प्रेक्षकांची उत्सुकता
उद्या 25 डिसेंबरला ख्रिसमस आहे. ही सुट्टी साजरी करण्यासाठी सिनेप्रेमी थिएटरमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांच्या जागा सुरक्षित करण्यासाठी त्यांनी ॲडव्हान्स बुकिंगही घाईघाईने केले आहे. मंगळवार, 24 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, काल बुधवारच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘मुफासा’ ची सुमारे 44 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. पीव्हीआरमध्ये ‘मुफासा’च्या 37 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. सिनेपोलिसची सात हजार तिकिटे विकिली आहेत. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची खूपच जास्त उत्सुकता दिसत आहे.
अशी ‘पुष्पा २’ ची अवस्था आहे
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर उद्याच्या ख्रिसमससाठी या चित्रपटाची आतापर्यंत २७ हजार तिकिटे विकली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’ची 21 हजार तिकिटे पीव्हीआरसाठी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बुक करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सिनेपोलिसची सहा हजार तिकिटांची विक्री झाली आहे. तुलनेने ‘मुफासा’ने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकले आहे. पंरतु हा चित्रपट पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करत आहे.
दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे?
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा पहिल्या क्रमांकाचा भारतीय चित्रपट ठरला आहे. हिंदी पट्ट्यातही त्याचा दबदबा अजूनही सुरु आहे. संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 1079 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर ‘मुफासा’ भारतीय प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झाला आहे. 20 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 48.08 कोटींचा व्यवसाय केला आहे.