फोटो सौजन्य- social media
गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली अंबानींच्या घरातील लग्न घटिका अखेर १२ जुलै २०२४ ला पूर्ण होणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलन येथे स्थित असलेल्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. अनंत- राधिकाच्या या शाही लग्नसमारंभात देश विदेशातील दिग्गज पाहुणे मंडळी उपस्थिती लावणार आहेत. भारतातील राजकीय, क्रीडा, व्यापार तसेच अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या समारोहात शामिल होणार आहेत.
लग्नसामारोहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार कि नाही यावर शंका उपस्थित केली जात आहे. जुलैच्या १३ तारखेला पीएम मोदी मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते अनेक योजनांचे उदघाटन होणार आहेत. यादिवशी पीएम मोदींच्या हस्ते मुलुंड गोरेगाव लिंक प्रोजेक्टच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. या कार्य्रक्रमांमुळे पीएम मोदी अनंत- राधिकाच्या या लग्नसोहळ्यात उपस्थिती लावणार कि नाही याची अद्याप खात्री नाही. जर पीएम मोदी या शाही सोहळ्यात उपस्थित नसू शकले तर ते रिसेप्शनला नक्कीच हजेरी लावू शकतात.
सूत्रांच्या अनुसार, लग्न सोहळ्यात अमेरिकेचे माजी विदेश मंत्री जॉन केरी, ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेयर, प्रधानमंत्री बोरिस जॉनसन, इटलीचे माजी पंतप्रधान मैटेओ रेंजीसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थिती लावणार आहेत. त्याचसह WWE मधून भारतातील घराघरात पोहचलेला जॉन सीना अनंत राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. जीन-क्लाउड वैन डेम, जेफ कूंस, डिवाइन इकुबोर, लुइस रोड्रिगेज, कीनन वारसामेसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार मंडळी या लग्न सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध अमेरिकी मुक्काबाज माइक टायसनदेखील मुंबईत दाखल झाला आहे. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे मालक- चालक तसेच CEO हा सोहळ्यात हजेरी लावणार आहेत.