vijay mallya and anurag kashyap photo
दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता लवकरच अनुराग कश्यप एका खास चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याविषयी चर्चा सुरु आहे. या आगामी चित्रपटामध्ये अनुराग हा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याची (Vijay Mallya) भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाचं नाव ‘फाइल नंबर ३२३’ (File Number 323) असं असणार आहे.
[read_also content=”नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा https://www.navarashtra.com/india/british-court-rejects-plea-to-fugitive-diamond-trader-nirav-modi-to-come-to-india-343050.html”]
अनुरागनं ‘फाइल नंबर ३२३’ बरोबरच ‘अकीरा’, ‘धूमकेतु’ आणि ‘मुक्काबाज’ या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तसेच छुरी या शॉर्ट फिल्ममध्ये देखील अनुरागनं काम केलं आहे. आता दिग्दर्शक कार्तिक के याच्या ‘फाइल नंबर ३२३’ चित्रपटात अनुराग हा विजय मल्ल्याची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. कार्तिकच्या या चित्रपटामधून विजय मल्ल्यासोबतच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची कथा देखील प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे.
अनुरागचा लूक हा विजय मल्ल्याच्या लूक प्रमाणेच असल्यानं चित्रपट निर्मात्यांनी अनुरागची निवड या भूमिकेसाठी केली आहे. मुंबईमध्ये २० नोव्हेंबरला ‘फाइल नंबर ३२३’ या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, ‘फाइल नंबर ३२३’ हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होईल.