अरबाज खान शुरा खान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खानसोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न झाले. अरबाज खान आणि शुराच्या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. दबंग अभिनेता आणि त्याची पत्नी अनेकदा सोशल मीडियावर कपल गोल देतात. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते.
आता अलीकडेच, शुरा-अरबाजचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेक युजर्स आणि पापाराझींनी अरबाज-शुराच्या आयुष्यात छोटा पाहुणा येणार असल्याचा अंदाज लावायला सुरूवात केली आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
शुरा-अरबाजचा व्हायरल व्हिडिओ
वास्तविक, २ जुलैच्या रात्री अरबाज आणि शुरा वांद्रे येथील रुग्णालयातून बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले होते. दोघांचा हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलीवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, शुरा निळ्या रंगाच्या कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे, अरबाज खान हिरव्या कॉलरच्या शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये खूपच डॅशिंग दिसत होता.
व्हिडिओग्राफरचा प्रश्न
दोघांनाही हॉस्पिटलबाहेर पाहताच अचानक व्हिडिओग्राफरने त्याना ‘क्या खुशखबरी है’ असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर नेहमी कॅमेरासमोरून पटकन निघून जाणारी शुरा बावचळली. मात्र या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया न देता अरबाज आणि शुरा निघून गेले. मात्र या प्रश्नामुळे आता खळबळ होताना दिसतेय.
अनेक प्रतिक्रिया
या प्रश्नावर आता सोशल मीडियावर उलट्यासुलट्या प्रतिक्रिया येत आहेत. फोटोग्राफर वा व्हिडिओग्राफरने विचारलेला प्रश्न योग्य की अयोग्य अशा स्वरूपाची चर्चा आता रंगली आहे. अनेकांना वाटतंय की तो त्यांचा खासगी प्रश्न आहे असे कोणीही डायरेक्ट विचारू शकत नाही तर काही जणांनी आपापले कयास लावायलाही सुरूवात केली आहे.