Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्मिती ताई घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’, रंगभूमीवर हसवणूक आणि धमाल मनोरंजना मिळणार दुहेरी डोस!

मराठी रंगभूमीवर लवकरच हास्याचा जल्लोष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘लाडकी विहीण योजना’ हे मराठी नाटक अभिनेत्री निर्मिती सावंत घेऊन येत आहेत. या नाटकात तगडे कलाकार काम करताना दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2026 | 11:33 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • निर्मिती ताई घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’
  • रंगभूमीवर हसवणूक आणि धमाल मनोरंजना डोस
  • कुठे आहे ‘लाडकी विहीण योजना’चा पहिला प्रयोग
शासनाच्या योजना जनतेच्या कल्याणासाठी असतात, मात्र ही ‘योजना’ थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’ हे धमाल, विनोदी आणि कौटुंबिक नाटक. रोजच्या धकाधकीतून आणि ताणतणावातून क्षणभर विरंगुळा देत, खळखळून हसवण्याचा या नाटकाचा उद्देश आहे. अष्टविनायक आणि पंचशील एंटरटेन्मेंट निर्मित हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत असून, नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांचे तर दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे.

‘हृदय आणि मन दोघांनाही स्पर्श केले…’, तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ चित्रपटाचे जावेद अख्तर यांनी केले कौतुक; म्हणाले ‘उत्कृष्ट कलाकृती

नावात ‘योजना’ असली तरी यात कोणतीही कागदपत्रे, अटी-शर्ती किंवा सरकारी बाबी नाहीत. आहे ते फक्त मिश्किल संवाद, खुमासदार प्रसंग आणि मराठी कुटुंबातील दैनंदिन आयुष्याचे हलकेफुलके, जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर विनोदी शैलीत भाष्य करत हे नाटक प्रेक्षकांना मनमुराद हसवणार आहे. पत्रकार परिषदेत कलाकारांनी स्पष्ट केलं की, “ही कोणतीही शासकीय योजना नाही. ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे.”

या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक यांना दिग्दर्शन आणि निर्मितीची संधी मिळाली आहे. त्यांनी अष्टविनायक संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांचे आभार मानत, हे नाटक प्रेक्षकांना दिलखुलास आनंद देईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच अभिनेता स्वप्नील जोशीने या उपक्रमात सहभागी होताना आनंद व्यक्त केला. अष्टविनायक संस्थेसोबत जोडले जाणे हा अभिमानास्पद क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. निर्माते दिलीप जाधव यांनी संहितेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत, या नाटकाचे १५० हून अधिक प्रयोग होतील, असे म्हटले.

लेखक प्रथमेश शिवलकर यांनी हे आपले पहिले व्यावसायिक नाटक असल्याचे सांगत, एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे विशेष असल्याचे नमूद केले. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनीही “ही सावंतांची योजना आहे, हसवण्यासाठी येतेय,” असे मिश्किलपणे सांगत संपूर्ण टीमचे कौतुक केले.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी आणि बॉबीसोबतच्या वादाच्या अफवांवर पूर्णविराम; Hema Malini यांचे स्पष्ट वक्तव्य

“प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असे सांगताना निर्मिती सावंत यांनी रंगभूमीवर पुनरागमन केल्याचा आनंद व्यक्त केला. चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकानंतर पुन्हा नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याने त्या भावुक झाल्या. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबतची जुळलेली ‘भट्टी’ आणि टीमचा उत्साह यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ प्रेक्षकांना नक्कीच खुश करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग ५ मार्च रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली; ६ मार्च रोजी दीनानाथ नाट्यगृह, पार्ले; ७ मार्च रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा; आणि ८ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहेत.

नाटकात निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पूर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार झळकणार आहेत. निर्माते दिलीप जाधव आणि प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील आणि संजय मेमाणे आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीतं क्षितीज पटवर्धन, गायिका राधिका भिडे, वेशभूषा पूर्णिमा ओक, रंगभूषा मदन गायकवाड आणि सूत्रधार प्रणित बोडके अशी तांत्रिक टीम सज्ज आहे.

 

Web Title: Nirmiti sawant to play lead role ladki vihin yojana marathi natak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
4

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.