अनेक वर्षांपूर्वी सलमान खानने दिलेला 'तो' सल्ला आजही अर्जुन कपूरच्या आठवणीत...
कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणारा अर्जुन कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सलमान खानने अर्जुन कपूरला दिलेल्या एका जुन्या सल्ल्यामुळे तो चर्चेत आहे. अर्जुन कपूरला इंडस्ट्रीत येऊन १२ वर्षे झाली आहेत, त्याने २०१२ मध्ये ‘इशकजादे’मधून डेब्यू केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून परिणीती चोप्रा होती. अलीकडेच, त्याच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीबद्दल बोलताना, अभिनेता म्हणाला की त्याच्या अभिनेता होण्यामागे सलमान खानचा मुख्य हात आहे.
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड; 8 जणांना घेतलं ताब्यात
२००९ मध्ये सलमान खानचा ‘वॉन्टेड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटात अर्जुन कपूर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने सांगितले की सलमान खानने दिलेल्या सल्ल्यामुळेच माझं वजन कमी झालं आहे. शिवाय त्याने दिलेल्या सल्ल्यामुळेच मी अभिनेता होण्याचा विचार केला होता. सलमान खानने अर्जुनला वजन कमी करण्याचा सल्ला देत त्याला एक उत्तम अभिनेता होण्याचाही सल्ला दिला होता. अर्जुन कपूरने सांगितलं की, मला नेहमीच चित्रपट दिग्दर्शक म्हणूनच राहायचे होते. त्यावेळी अर्जुनचे वजन १५० किलो होते.
लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचं उड्डाण, शेअर केली खास पोस्ट, पाहा PHOTO!
नुकतेच अर्जुन कपूरने राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत सलमान खानचे खूप कौतुक केले. त्याच्यामुळेच अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात कशी झाली हेही त्यांनी सांगितले. अर्जुनने सांगितले की, सलमान खानने मला वजन कमी करण्यास सांगितले, त्याच्यामुळेच खूप प्रेरित झालो. सलमान खानने अर्जुन कपूरला लोकांमध्ये नाचताना आणि विनोद करताना पाहिले, त्यानंतर त्याला अर्जुनमध्ये एक एंटरटेनर सापडला. कायमच अभिनेता म्हणून चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारा अर्जुन कपूर एक उत्तम विनोदी कलाकारही आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अभिनेता आशुतोष गोखलेची एन्ट्री, दिसणार खलनायकी भूमिकेत
वजन कमी करण्याबाबत सलमानने अर्जुनला एकदा प्रयत्न करायला सांगितले, त्यानंतर अर्जुनने त्याच्या फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. अर्जुन म्हणाला की, सलमान नेहमीच सिनेमाकडे प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून पाहतो. सलमानचे कौतुक करताना तो म्हणाला की, तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. तो फक्त प्रेक्षकांसाठीच काम करतो, आजही तो प्रेक्षकांशी कनेक्ट राहण्यासाठी बिग बॉस शो करतो. तो म्हणाला की हे सलमान खानच्या आत आहे कारण तो सलीम-जावेदच्या आसपास मोठा झाला आहे.