फोटो सौजन्य - Social Media
हटके स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ असणारा मराठी स्टार गश्मीर महाजनी सध्या फार चर्चेत येत आहे. अभिनेता तसा त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांशी नेहमी संपर्कात असतो. दरम्यान, त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘Ask Me Question’ या इंस्टाग्राम फीचर्सचा लाभ घेतला आहे. या फीचर्सचा लाभ घेत त्याच्या चाहते मंडळींनी अभिनेत्याला डायरेक्ट प्रश्न केले आहेत आणि अभिनेत्याने त्याचे उत्तरं चाहत्यांना दिली आहेत.
दरम्यान, या सर्व प्रश्नांमध्ये असणाऱ्या एका प्रश्नाने संपूर्ण मराठी सिनेचाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. तो प्रश्न असा होता की,”गश्मीर तुझी मराठी सिनेसृष्टीतील क्रश कोणती?” तेव्हा गश्मीरने चाहत्याच्या या स्पेशल प्रश्नाला उत्तर दिले आहे. गश्मीर महाजनी म्हणतो की,” अभिनेत्री अश्विनी भावे त्याच्या क्रश आहेत.” हे ऐकून बऱ्याच चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला असला तरी असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारले गेले आहेत.
एका चाहत्याने ‘जेव्हा तुला घाबरल्यासारखं तेव्हा तू काय करतोस?’ असा सवाल केला होता तेव्हा गश्मीर म्हणतो की, “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेतो.” त्याचे म्हणणे आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमचे कुटुंब तुमचा मार्ग सोपा करण्यास फार महत्वाची कामगिरी बजवतात. दरम्यान, एका चाहत्याने त्याला त्याच्या आवडत्या Co Actress विषयी विचारणा केली असता त्याने अतिशय हुशारीने उत्तर दिलेले पाहायला मिळाले आहे. त्याने त्याच्या पत्नीचे नाव घेत ‘ती ही फार अभिनय करत असते’ असे विनोदी उत्तर दिले आहे.
एका चाहत्याने तर अभिनेत्याकडून चक्क अभ्यास विसरत असण्याची तक्रार करत सल्ला मागितला आहे. यावर ‘मला विसरून जा, समस्या आपोआप सुटतील’ असा विनोदी सल्ला त्याने दिला आहे.