(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आतिफ अस्लम यांचे वडील मोहम्मद अस्लम यांचे बुधवार, म्हणजे आज १३ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. गायकाचे वडील ७७ वर्षांचे होते. आतिफ अस्लमने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. गायकाने पोस्टमध्ये त्याच्या वडिलांचा फोटो शेअर केला आणि एक भावनिक नोट देखील लिहिली आहे. तसेच गायक आतिफ अस्लमचे चाहते देखील या बातमीने दुःख व्यक्त करत आहेत.
आतिफ अस्लमची पोस्ट व्हायरल
आतिफ अस्लमचे सोशल मीडिया अकाउंट भारतात दिसत नाही आहे. त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये गायक त्याच्या वडिलांना गालावर किस करताना दिसत आहे. तसेच त्याने पोस्ट शेअर करत एक भावुक नोट देखील लिहिली आहे. चाहते आता पोस्टवर कंमेंट करून गायकाचे सांत्वन करत आहेत.
आतिफने पोस्टमध्ये काय लिहिले?
आतिफ अस्लमने त्याच्या आणि त्याच्या वडिलांच्या फोटोसह पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘आमच्या आयर्न मॅनला शेवटचा सलाम. तुम्ही जिथे असाल तिथे प्रेमाने राहा, अब्बू जी.’ आतिफ अस्लम त्याच्या वडिलांना आयर्न मॅन म्हणत असे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आतिफ अस्लमने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवण्याची विनंती करत आहेत.
आतिफ अस्लमचे वडील आजारी होते
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अस्लम हे बऱ्याच काळापासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मोहम्मद अस्लम यांना अस्रच्या नमाजानंतर लाहोरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अनेक पाकिस्तानी कलाकारांनी आतिफ अस्लमच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.