फोटो सौजन्य - Social Media
आलिया भट स्टारर मूवी ‘राजी’चे दिग्दर्शक मेघना गुलजारचा आगामी सिनेमा डायरामध्ये मोठ्या पडद्यावर करीना कपूरसोबत आयुष्यमान खुराणा झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. सिनेसृष्टीत त्यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल चर्चेला उधाण आले होते. यादरम्यान आयुष्यमानकडून डायरासाठी रेड सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे दिग्दर्शक मेघना गुलजार डायरा चित्रपटासाठी नवीन हिरोच्या शोधात आहे. यादरम्यान आयुष्यमानचे डायराला राम राम करण्यामागचे कारण समोर आले आहे. डेट क्लॅशमुळे आयुष्यमानला हे निर्णय घ्यावे लागले आहे.
सुंत्रानुसार, आयुष्यमान खुराणा मेघना गुलजारच्या डायरा सिनेमासाठी तारीख काढण्यास असमर्थ ठरत आहेत. हा सिनेमा वर्षाखेरीज येण्याची दाट शक्यता आहे. पण त्याच वेळी आयुष्यमान खुराणा अमेरिकेत म्युजिक टूरवर असणार आहे. त्याचबरोबर सध्या आयुष्यमानकडे सनी देओलचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ सह इतर अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे आयुष्यमान डायरा चित्रपटासाठी वेळ काढण्यात असमर्थ ठरताना दिसून येत आहे.
दिग्दर्शक मेघना गुलजारने करीना कपूर आणि आयुष्यमान खुराणाला डायराची स्क्रिप्ट ऐकवली होती. त्यावेळी त्या दोघांना स्क्रिप्ट खूप आवडली होती. पण अद्याप पेपरवर्क झालेले नव्हते. आयुष्यमानकडून चित्रपटाबद्दल काही रिस्पॉन्स न आल्यामुळे दिग्दर्शक मेघनाने मुख्य भूमिकेसाठी नवीन चेहरा शोधण्यास सुरु केले आहे. तर डायरा सिनेमाचा नवीन हिरो कोण असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आगामी काळात, आयुष्यमान खुराणा हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तो सध्या एका स्पाय कॉमेडी फिल्मवर काम करत आहे, ज्याचे दिग्दर्शन आकाश कौशिक आहेत. त्याचबरोबर आयुष्यमान मुंज्याचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘ ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ यात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.