बिग बॉसच्या घरात आता कल्ला नाही, राडा होणार; निक्की तांबोळी ग्रुप A चे रंग पाहून संतापली
दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरातला खेळ अधिकच रंजक होत चालला आहे. आज बिग बॉसच्या घरात रितेश देशमुख चौथा ‘भाऊचा धक्का’ घेणार आहे. यावेळी रितेश स्पर्धकांना आणखी एक धक्का देणार आहे. आजच्या ‘भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये, रितेश ‘भाऊची चक्रव्ह्यूह’ची खोली उघडणार आहे. यामध्ये घरातील स्पर्धकांना आपल्या मित्रांचे आणि ग्रुप मेंबर्सचे खरे रंग दिसणार आहेत. भाऊच्या चक्रव्ह्यूहात खरंतर एकमेकांच्या मनातलं बाहेर येणार आहे. एकंदरीतच घरातील सदस्यांसमोर सगळं उघड होणार आहे. आजच्या भागात निक्कीसमोर तिच्या ग्रुपमधील सदस्यांचे खरे चेहरे येणार आहेत.
काही मिनिटांपूर्वीच आजच्या एपिसोडमधील आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये, रितेश ‘भाऊची चक्रव्ह्यूह’ची खोली उघडणार आहे. यात घरातील सदस्यांना आपल्या मित्रांचे आणि ग्रुप मेंबर्सचे खरे रंग दिसणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये ‘भाऊच्या चक्रव्ह्यूह’च्या खोलीत पहिली स्पर्धक निक्की तांबोळीच जाणार आहे. यावेळी तिला घरातील सदस्य तिच्याबद्दल काय बोलतात ? हे दाखवलं जातं. दाखवल्यानंतर निक्की बाहेर येताना टाळ्या वाजवत येते.
टाळ्या वाजवत निक्की म्हणते, “मी ह्या टाळ्या फेक ग्रुप A साठी वाजवत आहे. त्यांच्या बोलण्यात काहीच दम नाहीये. ते सर्व हलके लोकं आहेत. माझा वादा आहे सर, मी ग्रुप A ला बिग बॉसची ट्रॉफी उचलून देणार नाही.” निक्कीसमोर सत्य आल्यानंतर आता ती नक्की कोणाच्या बाजुने खेळणार की नवा ग्रुप तयार करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. निक्की आणि अभिजीत ग्रुप C बनवणार असल्याच्याही चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. घरातल्या स्पर्धकांचं खरं रुप डोळ्यासमोर आल्यानंतर निक्की कसा खेळ खेळणार ? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.
आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात प्रमोशनसाठी दोन टीम येणार आहे. ‘इमरजन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनता श्रेयस तळपदे येणार आहे. तर, कलर्स मराठीवरील ‘दुर्गा’ मालिकेची टीम बिग बॉसच्या घरात प्रमोशनसाठी येणार आहे.
इरिना रुडाकोव्हा, अभिजीत सावंत, आर्या जाधव आणि वैभव चव्हाण या नॉमिनेटेड सदस्यांपैकी घराबाहेर कोण जाणार हे आजच्या (२५ ऑगस्ट) एपिसोडमध्ये कळणार आहे.