Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्याच आठवड्यात एलिमिनेट झालेल्या पुरुषोत्तम पाटलांची क्रेझ परदेशातही, जपानहून गाठली थेट आळंदी, पाहा Video

किर्तनकार पुरूषोत्तम दादा पाटील ह्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली आहे. ते देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पण पहिल्याच आठवड्यात कमी मतं मिळाल्यामुळे एलिमिनेट झाले.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 25, 2024 | 07:36 PM
पहिल्याच आठवड्यात एलिमिनेट झालेल्या पुरुषोत्तम पाटलांची क्रेझ परदेशातही, जपानहून गाठली थेट आळंदी

पहिल्याच आठवड्यात एलिमिनेट झालेल्या पुरुषोत्तम पाटलांची क्रेझ परदेशातही, जपानहून गाठली थेट आळंदी

Follow Us
Close
Follow Us:

अनेक सेलिब्रिटी असो किंवा सोशल मीडिया एन्फ्लूएंसर्सना असो बिग बॉसच्या घरातून लोकप्रियता मिळाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे. यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून मराठमोळे सेलिब्रिटी तर आले आहेतच. शिवाय सोशल मीडिया एन्फ्लूएंसर्सनेही यावेळी सहभाग घेतला आहे. किर्तनकार पुरूषोत्तम दादा पाटील ह्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली आहे. ते देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पण पहिल्याच आठवड्यात कमी मतं मिळाल्यामुळे एलिमिनेट झाले.

हे देखील वाचा – बिग बॉसच्या घरात आता कल्ला नाही, राडा होणार; निक्की तांबोळी ग्रुप A चे रंग पाहून संतापली

जरीही पुरुषोत्तम पाटील पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाले असले तरीही त्यांचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. ‘बिग बॉस मराठी’ पाहणाऱ्या परदेशी चाहत्याने पुरुषोत्तम यांना भेटण्यासाठी थेट जपानहून आळंदी गाठली आहे. पुरुषोत्तमदादा पाटील यांनी इन्स्टाग्रामवर जपानी चाहत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओपाहून चाहते पुरूषोत्तम यांचं कौतुक करीत आहेत. पुरूषोत्तम पाटील मोजकेच काही दिवस बिग बॉसच्या घरात राहिले तरीही त्यांचा चाहतावर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंतच नाही तर जगभरात पोहोचले आहे.

 

“बिग बॉस कार्यक्रमाची लोकप्रियता…हा क्यूहे जपानचा आहे. बिग बॉस मराठीच्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचे भाग पाहून मला भेटायला आला आहे. माझे मित्र ईश्वर आणि प्रियांका यांच्याबरोबर तो भेटायला आला… रामकृष्ण हरी, जय शिवराय”, असं कॅप्शन देत पुरुषोत्तम पाटील यांनी जपानी चाहत्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्वत: पुरुषोत्तम पाटील आणि त्यांचा परदेशी चाहता दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पुरुषोत्तम पाटील म्हणतात, “रामकृष्ण हरी… माझ्यासोबत क्यूहे आहे. हा जपानचा आहे. त्याने बिग बॉसचे काही (Bigg Boss Marathi) एपिसोड्स पाहिले. ते एपिसोड्स पाहून तो आज मला आळंदीत भेटायला आला आहे.”

हे देखील वाचा – ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री आशा शर्मा यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुरुषोत्तम पाटील शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, “माझे मित्र ईश्वर आणि प्रियंका यांच्यासोबत तो आळंदीत आला आहे. खरं मला असं वाटतं की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून काय साध्य झालं? जर असं कोणी मला विचारलं, तर मी असं म्हणेल की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून असे काही मित्र माझ्या जीवनात येत आहेत. हेच साध्य झालं. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.” यावेळी पुरुषोत्तम पाटील यांचा परदेशी चाहताही व्हिडिओमध्ये ‘रामकृष्ण हरी…’ बोलताना दिसत आहे. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रसिद्धीचे चाहते तुफान कौतुक करीत आहेत.

Web Title: Bigg boss marathi 5 purushottam dada patil meet to japanese fan see video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 07:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.