गोलिगत सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घरात नवी खेळी
बिग बॉसच्या घरामध्ये सध्या सर्वच स्पर्धक आपल्या हटक्या स्ट्रेटेजीने खेळ खेळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या गोलिगत सूरज चव्हाणची कमालीची चर्चा होताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला सूरज चव्हाण सध्या घरात फायर मोडमध्ये आला आहे. काही दिवसांपासून घरात स्पर्धकांमध्ये आपआपसात जोरदार वाद होताना दिसत आहे. नुकताच जान्हवी किल्लेकरचं आणि पंढरीनाथ कांबळेमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आता यानंतर प्रत्येक स्पर्धक आपल्या स्टाईलने खेळ खेळताना दिसत आहे.
नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत आणि आर्या जाधवला म्हणतोय की, “जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण स्वत: उभा राहणार… बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा… तू नड” गोलीगत सूरज चव्हाणने जेव्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली, त्यावेळी तो खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला ‘बिग बॉस’चा खेळ कळू लागला आहे. त्यामुळे आता सूरज ‘बिग बॉस’च्या घरात जिथे चुकीचं वागत आहे, तिथे अन्यायाविरूद्ध तो लढताना दिसत आहे.
काही तासांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक प्रोमो व्हायरल होत आहे. त्या प्रोमोमध्ये, अरबाज, अंकिता, अभिजित, घनश्याम, इरिना आणि वैभव यांच्यामध्ये खेळण्याच्या स्ट्रेटेजीवरून चर्चा होत आहे. अरबाज, वैभव आणि अंकिता हे तिघंही निक्कीच्या वागणुकीवर बोलताना दिसत आहे. त्यासोबतच अभिजितच्या आणि निक्कीच्या फ्रेंडशिपवरूनही चर्चा होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आजच्या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धक नॉमिनेशन टास्क खेळणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाने आपल्याला ज्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढायचे आहे. त्या स्पर्धकाचे फोटो गळ्यात घालाचे आहे. गळ्यात घातलेला फोटो समोर असलेल्या चुलीत टाकायचा आहे.
आता आजच्या एपिसोडमध्ये कोणकोणते स्पर्धक एलिमिनेट होणार ? कोणाला कमी वोट्स मिळून घराच्या बाहेर जाणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.