
पाच स्पर्धक अन् एक विजेता, कोणाच्या नावावर होणार Bigg Boss Marathi 5 ची रत्नजडीत ट्रॉफी
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन लवकरच संपणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला ग्रँड फिनाले पार पडणार आहे. १६ स्पर्धक आणि १ वाईल्ड कार्ड स्पर्धक अशा १७ स्पर्धकांमध्ये यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन खेळवण्यात आला. या १७ स्पर्धकांमधून प्रेक्षकांना टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत. यातून एका स्पर्धकाच्या नावावर ट्रॉफी असणार आहे. गेल्या काही तासांपूर्वीच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून खास प्रेक्षकांना आणि स्पर्धकांनाही ट्रॉफीची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.
हे देखील वाचा – सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी ‘पाणीपुरी’ चित्रपटात रंगणार…
ह्या रत्नजडीत ट्रॉफीवर कोणत्या स्पर्धकाचं नाव लागणार ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या ६ ऑक्टोबरलाच कळेल. यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये एकूण सहा स्पर्धक असणार आहेत. यामध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पॉवार असे सहा स्पर्धक आहेत. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, स्पर्धकांनाही आणि प्रेक्षकांनाही ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची ट्रॉफी दाखवण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने यंदाच्या सीझनची ट्रॉफी खास असणार आहे. मुख्य बाब म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना ट्रॉफीची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, ‘लाईक आणि सब्सक्राईब’ची टीम प्रमोशनसाठी येणार आहे. यावेळी प्रमोशनसाठी अमृता खानविलकर आणि अमेय वाघने सुद्धा हजेरी लावली होती. या दोघांनीही बिग बॉसच्या प्रेक्षकांनाही आणि स्पर्धकांनाही खास गिफ्ट दिलेलं आहे. त्यांनी दोघांनीही मिळून बिग बॉसची ट्रॉफी लाँच केलेली आहे. यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरला आहे. या खास ठरलेल्या सीझनमध्ये होस्ट बदलले, शिवाय टास्कमध्ये येणारे नवनवीन ट्विस्ट त्याप्रमाणेच ट्रॉफीही बनवण्यात आली आहे. या वर्षाची थीम चक्रव्यूहची होती. तर चक्रव्यूहचं चिन्ह, तर त्यापूढे बिग बॉसचा डोळा दिसतोय. या खास ट्रॉफीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
येत्या, ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. यंदाचा सीझन ७० दिवसांचा अर्थात १० आठवड्याचा होता. दहाव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण ७ स्पर्धक होते. त्यातील एका स्पर्धकाने काल म्हणजेच ३ ऑक्टोबरला वर्षा उसगावकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. तर आणखी एक स्पर्धक आज बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. त्यामुळे या सीझनचे टॉप ५ स्पर्धक आज मिळणार आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि धनंयज पोवार हे सदस्य आहेत. आता ह्या सहा स्पर्धकांमधून कोणते स्पर्धक टॉप ५ मध्ये जाणार ? आणि त्यातून कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.