बिग बॉसच्या चक्रव्ह्यूहात पॅडी कांबळे मांडणार धनंजय आणि अंकिताबद्दलचं ‘निस्वार्थी’मत, पुन्हा नवीन ग्रुप ?
गेल्या काही दिवसांपूर्वी भाऊच्या धक्क्यावर ‘भाऊच्या चक्रव्ह्यूह’ रुम सुरू झाली आहे. प्रत्येक ‘भाऊच्या धक्का’वर रितेश त्या रुममध्ये बोलवून इतर सदस्य त्याच्याबद्दल काय बोलतात ? त्याच्या विषयीचे मतं कशी आहेत ? असं एकंदरितच मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच सध्या आजच्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेशने घरातल्या एका स्पर्धकाला बोलवून त्याच्या विषयी घरातले स्पर्धक काय बोलतात ? हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आजच्या एपिसोडमध्ये, पॅडी कांबळेला बोलवलं जाणार आहे. ‘भाऊच्या चक्रव्ह्यूह’ रुममध्ये गेल्यानंतर पॅडीला कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे ? याबद्दल कळणार आहे.
दरम्यान, ‘भाऊच्या चक्रव्ह्यूह’ रुममध्ये, गेल्यानंतर एकंदरित सर्वच सदस्यांची चक्र बदलत असतात. समोर आलेली गोष्ट पाहूनच सदस्य चक्रावून जातात. कोण आपला कोण परकं या गोष्टी सदस्यांना कळतात. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख पॅडीला चक्रव्यूह रूममध्ये बोलवताना दिसत आहे. सर्व सदस्यांची आपल्याबद्दलची मतं जाणून घेतल्यानंतर पॅडी म्हणतो, “यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीत आपला स्वार्थ बघितला असेल, घराबाहेर गेल्यानंतर त्यांना कळेल आपली तेव्हाची स्टेटमेंट खूप चुकीचे होते. कारण मी कधीच स्वार्थीपणे कोणती गोष्ट केली नाही. प्रत्येक गोष्टीत नि:स्वार्थ भावना होती.” त्यानंतर बाहेर येत पॅडी दादा अंकिता आणि डीपी दादाचे आभार मानताना दिसत आहे.
डीपी दादा आणि अंकिताबद्दल पॅडी कांबळेला काय कळाले आहे, हे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल. गेल्या अनेक दिवसांपासून पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, डीपी दादा, आर्या जाधव, सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य ग्रुप बी मध्ये आहेत. प्रोमोनुसार, आता ग्रुप बीचेही दोन गट पडणार का ? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच आजच्या भागात महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ सदस्यांना मोठा धक्कादेखील देणार आहे.