"माफी माग, ते तुला नक्की...", आर्याच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
बिग बॉसच्या घरात सातव्या आठवड्यात निक्की आणि आर्याचं कडाक्याचं भांडण झालं. त्यांच्या वादाने अख्खा आठवडा चर्चेत राहिला. आज म्हणजेच शनिवारी सातव्या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ आहे. आजच्या भाऊच्या धक्कावर बिग बॉस तिला काय शिक्षा देणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण असं असलं तरीही अख्खा महाराष्ट्र आर्याच्या बाजुने उभा राहिला आहे. तिच्या समर्थनार्थ अख्खा महाराष्ट्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतोय. शिवाय इंडस्ट्रीतीलही अनेक कलाकार तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेता अभिजित केळकर ह्याने एक इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिजितने आर्याचे कौतुक केले असून बिग बॉसची माफी माग ते तुला पुन्हा नवीन संधी देतील, असं सांगितलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो, “…आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं पण…हा खेळ संयमाचाही आहे, मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार… पण माफी माग. तू जेन्यून (खरी) आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील…”, अशी पोस्ट अभिजीतने केली आहे.
“माफी माग, ते तुला नक्की…”, आर्याच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
गुरूवारी झालेल्या एपिसोडमध्ये, निक्की आणि आर्यामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान वॉशरूम एरियामध्ये काही कारणास्तव वाद झाला. त्यांचा हा वाद इतका टोकाला गेला की, आर्याने रागाच्या भरात थेट कानाखालीच दिली. निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल म्हणू बाथरूमचा दरवाजा लावून घेतला होता. निक्कीच्या म्हणण्याप्रमाणे अरबाजने दरवाजा जोरात ढकलत निक्की वॉशरुममध्ये आली. मागोमाग जान्हवीसुद्धा हिऱ्याचं रक्षण करण्यासाठी आत आली.
याचदरम्यान आर्या- निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन वाद झाले. त्यामुळे भडकलेल्या आर्याने निक्कीच्या थेट कानाशिलातच वाजवली यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत होती. घटना घडल्यानंतर बिग बॉसच्या समोर आर्या स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाली की, “दरवाजा उघडल्यावर निक्की आत आली. तिला मी बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिचा हात माझ्या डोळ्याखाली लागला आणि या झटापटीत मी तिला मारलं.”
हे देखील वाचा- शाहरुखच्या ‘किंग’ला ‘लव्ह अँड वॉर’ देणार टक्कर, चित्रपटाची रिलीज डेट झाली जाहीर!
दरम्यान, या प्रकरणावर सध्या सोशल मीडियावरून आर्याला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर आर्याला बिग बॉस काय शिक्षा सुनावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.