व्हेंटिलेटरवर असणाऱ्या आईचे मुलाने केलं गाणं रिलीज (फोटो सौजन्य-X)
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लोक गायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असून आता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 2017 पासून ते मल्टिपल मायलोमा (बोन मॅरो कॅन्सरचा एक प्रकार) या आजाराने ग्रस्त आहेत. शारदा सिन्हा यांच्या आरोग्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. याचदरम्यान त्यांच्या मुलाने त्यांचे नवीन छठ गाणे रिलीज केले आहे.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित बिहारच्या लोकगायिका शारदा सिन्हा दिल्ली एम्समध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्यांचा मुलगा अंशुमन सिन्हा याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून शारदा सिन्हा यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून अंशुमनने सर्व भाविकांना छठ मैयाची प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांच्या मुलाने छठपूर्वी त्यांचे नवीन गाणे ‘दुखवा मिटायं छठी मैया’ हे गाणं रिलीज केले आहे.
शारदा सिन्हा जी की तबियत बिगड़ गई है और वह अब वेंटीलेटर पर हैं. उनके बेटे ने सभी से प्रार्थना करने की अपील की है.🙏
आपकी प्रार्थनाएँ और शुभकामनाएँ उनके लिए महत्वपूर्ण हैं.#shardasinha #BreakingNews pic.twitter.com/21wgNHXWhM
— Shubham Singh (@Shubhamsingh038) November 4, 2024
बिहार नाइटिंगेल शारदा सिन्हा यांना 25 ऑक्टोबर रोजी प्रकृती बिघडल्याने एम्स कॅन्सर सेंटरच्या मेडिकल ऑन्कोलॉजी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मेडिकल ऑन्कोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मैथिली आणि भोजपुरीची लोकगायिका म्हणून त्यांची ओळख आहे. शारदा सिन्हा यांच्या छठ पूजेची गाणी खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांना बिहार कोकिला म्हणून देखील ओळखले जाते.तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील गाणं गायले आहेत.
हे सुद्धा वाचा: रजत अविनाशमध्ये पुन्हा धक्काबुक्की! व्हिव्हीयन डीसेनाने लावली आग
शारदा सिन्हा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री चिराग पासवान सोमवारी एम्समध्ये पोहोचले होते. यापूर्वी अश्विनी कुमार चौबे, रामनाथ ठाकूर आणि धरमशीला गुप्ता यांनीही सिन्हा यांची भेट घेतली. चिराग पासवान यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शारदा सिन्हा यांच्या प्रकृतीची माहिती दिली आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित गायिका शारदा सिन्हा (72) यांना 2017 मध्ये मल्टीपल मायलोमा नावाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. शारदा सिन्हा यांनी काही आठवड्यांपूर्वी त्यांचे पती ब्रज किशोर सिन्हा यांचे निधन झाले. त्यांना ब्रेन हॅमरेजने ग्रासले होते. या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी त्यांच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला. पतीच्या निधनानंतर शारदा सिन्हा यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शारदा सिन्हा यांनी ‘जैसे मैने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ या बॉलिवूड चित्रपटांसाठीही लोकप्रिय गाणी गायली आहेत. अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील ‘तार बिजली के जैसे’ हे गाणेही त्याने गायले आहे. 1991 मध्ये त्यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा: बिग बॉसच्या घरात पक्षपात! व्हीव्हीयन डिसेना जिंकवण्यासाठी प्रयत्न सुरु, करणला केलं जातंय टारगेट