फोटो सौजन्य - Jio Cinema
रजत दलाल विरुद्ध अविनाश मिश्रा : टेलिव्हिजनवर सर्वाधिक चर्चेत असलेला रिॲलिटी शो बिग बॉस १८ सोशल मीडियावर रोज ट्रेण्ड करत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. रोज या घरामध्ये काही नवीन पाहायला मिळत असते. कालच्या भागामध्ये दोन नव्या वाइल्ड कार्ड सदस्यांनी एपिसोडमध्ये कहर केला. यामध्ये इशा सिंह आणि कशिश कपूर यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला. त्याचबरोबर रजत दलाल आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये शायरीचा माध्यमातून निशाणा लावताना दिसले.
आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशचे प्रक्रिया दाखवली जाणार आहे. यामध्ये विवियन डीसेना आणि करणवीर मेहरा यांच्यामधील मैत्रीमध्ये तडा जाताना दिसला आहे. आता अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये वादावरून आता धक्काबुक्कीपर्यंत रजत आणि अविनाश मिश्रा या दोघांचा वाद पोहोचणार आहे. अखेर एक महिन्यानंतर आता विवियनदेखील आपले खरे रूप दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : एलिस कौशिकने दिली करणवीर मेहराला जीवे मारण्याची धमकी! प्रेक्षक संतापले
सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे, यामध्ये रजत आणि अविनाश यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या प्रमोमध्ये व्हिव्हीयन डीसेना रजत दलालला म्हणतो की, जेव्हा तू जेलमध्ये होतास तेव्हा तू सगळ्यांना समान जेवण का नाही दिलेस? यावर रजत दलाल म्हणतो की जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा बोलायला हवे होते. तेव्हा व्हिव्हीयन डीसेना म्हणतो की मी बोलत नाही वाजवत असतो. रजत व्हिव्हीयन डीसेनाच्या समोर जातो आणि म्हणतो बघ मी तुला हात लावून दाखवला तुझ्यासारखे छत्तीस येतात.
यावर व्हिव्हीयन डीसेना म्हणतो की मी तुला दरवाज्यापर्यंत सोडायला जाणार आहे. यावर मध्येच अविनाश मिश्रा येतो आणि रजतला म्हणतो की मी इथे बसलो आहे आणि आधीच तुझी एवढी फाटली आहे. रजत यावर म्हणतो बघा बघा व्हिव्हीयन डीसेनाचा चेला उभा राहिला आहे त्याच्यासाठी यावर अविनाश मिश्रा येतो आणि रजत दलालच्या समोर येऊन उभा राहतो. यावर रजत दलाल संतप्त होतो आणि त्याला धक्का द्यायला सुरुवात करतो.
Promo #BiggBoss18 #RajatDalal Vs #VivianDsena and #AvinashMisha pic.twitter.com/9OPtgySler
— The Khabri (@TheKhabriTweets) November 4, 2024
रजत दलाल भडकला
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून कुटुंबीयांनी रजत दलाल यांना थांबवण्यास सुरुवात केली. रजत दलाल यादरम्यान अविनाशला ओरडल्याचेही दिसून आले आहे, पहा गुरुजी; तुमचा शिष्य तुमच्यासाठी उभा आहे. रजत दलालने अविनाशला पाठीमागून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि कधीही दोघेही एकमेकांच्या अंगावर धाऊन जातील अशी भिती कुटुंबीयांना दिसून आल्याचे जाणवले आहे. या संघर्षात दोघांना बाजूला करताना ईशादेखील मध्ये पडल्याचे दिसून येत आहे. नंतर विवियन या मुद्द्यावर रजत दलालला कॉर्नर करताना दिसतो. तो म्हणाला- जर तुमच्याकडे काहीच नाहीये तर दार उघडे आहे, इथून निघून जा.