फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिऍलिटी बिग बॉस १८ मध्ये सध्या प्रचंड वाद पाहायला मिळत आहेत. आजपासून या शोचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. घरामध्ये कालच्या भागामध्ये दोन वाईल्ड सदस्यांनी एंट्री केली आहे. त्यामुळे आता बरीच घरातील नात्यांमध्ये बदल पाहायला मिळत आहे. या नव्या सीझनमध्ये घराचा कॅप्टन नसून टाइम गॉड असणार आहे. या टाइम गॉडला घरामध्ये अनेक मोठ्या पॉवर दिल्या जाणार आहेत. दुसऱ्या आठवड्यामध्ये अरफीन खानला टाइम गॉडचे पद मिळाले होते, यावेळी त्याला फार काही पॉवर देण्यात आल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये कोणत्या सदस्यांना हे पद देण्यात आले नाही त्यानंतर आता चौथ्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क देण्यात आला होता. यामध्ये शिल्पा शिरोडकर यांना टाइम गॉड पदासाठी करणवीर मेहरा आणि व्हीव्हीयन डिसेना या दोघांमधून एका सदस्यांना निवडायचे होते.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात कॅटफाईट! कशिश कपूर विरुद्ध ईशा सिंह
यावेळी शिल्पा शिरोडकरने व्हीव्हीयन डिसेनाला टाइम गॉडचे पॅड दिले आहे. सध्या तो टाइम गॉडच्या पदावर आहे, मागील आठवड्यापासून त्याला बऱ्याच पॉवर बिग बॉस देत आहे. त्याला मागील आठवड्यामध्ये कोणते सदस्य जेल जाणार हे सुद्धा त्यानेच सांगितले. मागील तीन आठवड्यापासून जेलच्या सदस्यांना असलेली पॉवर त्यावेळी काढून घेण्यात आली होती. त्याचबरोबर आज नॉमिनेशनचा टास्क घरामध्ये होणार आहे यामध्ये बिग बॉस व्हीव्हीयन डिसेनाला कोणता सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार यासाठी नावे घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. आजच्या लाईव्ह फीडमध्ये सारा अरफीन खान चुम दारंग बोलताना देखील दिसली की ” व्हीव्हीयन डिसेना आणि घरामधील सदस्यांसोबत पक्षपात केला जात आहे” हे फक्त घरांमधील सदस्यांनाच नाही तर बिग बॉसच्या प्रेक्षकांना सुद्धा असे वाटत आहे.
Nomination ka superpower hai Vivian ke haathon mein. Are you ready for the drama? 🙊
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.#BiggBoss18 #BiggBoss #BB18@ChahatPofficial @KaushikAlice @Avinash_galaxy @KaranVeerMehra… pic.twitter.com/hQv6Xf3Vlo
— Bigg Boss (@BiggBoss) November 4, 2024
व्हीव्हीयन डिसेनाला जास्तीत जास्त बिग बॉस पॉवर देत आहेत तर दुसरीकडे प्रत्येक गोष्टीवर अभिनेता करणवीर मेहराला मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहेत. विकेंडच्या वॉरला सुद्धा सलमान खानने त्याच्या गेमप्लॅन त्याचबरोबर त्याच्या घरांमधील नात्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. एवढेच नवे स्वतः बिग बॉस सुद्धा वारंवार त्याच्या खेळावर टोकताना दिसत आहेत. कालच्या भागामध्ये रवी किशन हे बिग बॉसच्या घरामध्ये आले होते यामध्ये त्यांनी सुद्धा त्याला सगळ्यांसमोर बरीच टोमणी मारताना दिसले आहेत.