प्रसिद्ध अभिनेत्याची पुतणी, राजघराण्यातील सुंदरी; मुस्लीम क्रिकेटरशी विवाह असं आहे सागरिका घाटगेचं आयुष्य
‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’ चित्रपटात काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाटगेचा आज ८ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. ‘चक दे इंडिया’तील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या सागरिकाने मराठी आणि हिंदीच नव्हे तर, इतर भाषांमधील सिनेमातंही काम केलं आहे. सागरिकाने ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. पण त्यानंतर मात्र ती फार कुठे झळकली नाही. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया…
प्रसिद्ध थिएटर आर्टिस्टचं निधन, अनेक दिवसांपासून देत होते दुर्धर आजाराशी लढा
गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दुर असलेली सागरिका घाटगेचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी झालेला आहे. ती आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘चक दे इंडिया’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली सागरिका रियल लाईफमध्येही हॉकी प्लेयर आहे. त्यामुळे तिचं चित्रपटामध्ये हॉकी प्लेअरच्या भूमिकेसाठी लगेचच निवड झाली. मुख्य बाब म्हणजे, खऱ्या आयुष्यात सागरिका राष्ट्रीय पातळीवरचे हॉकीचे सामनेही खेळली आहेत. चित्रपटात अभिनेता शाहरुख खान कोचची भूमिका साकारली होती. तर सागरिकानं प्रीती सबरवाल ही भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक झालं होतं.
सागरिका घाटगे कोल्हापूरच्या शाही घराण्यातील आहे. एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची सागरिका पुतणी आहे असून विजयसिंग घाडगे यांची ती कन्या आहे. ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे मुख्य भूमिकेत असलेला ‘प्रेमरोग’ चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटात पद्मिनी कोल्हापूरेच्या पतीची भूमिका विजयेंद्र घाटगे या अभिनेत्याने साकारली होती. सागरिका ही विजयेंद्र घाटगे या अभिनेत्याची पुतणी आहे. विजयेंद्र यांनी सत्तरीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्तचोर, रजिया सुलतान, सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच जुनून, सिंहासन बत्तीसी, बुनियाद यांसारख्या मालिकांमध्येदेखील काम केले आहे. विजयेंद्र सिंहराव घाटगे हे इंदौरच्या शाही घराण्याचे वंशज आहेत. इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या सीताराजे घाटगे यांचे विजयेंद्र हे पुत्र आहेत.
सागरिकाने क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा किस्सा आजही चर्चेत असतो. कमी लोकांना माहीत आहे की, दोघांच्या घरच्यांनीही सहज होकार दिला नव्हता. झहीरच्या घरच्यांनी ‘चक दे इंडिया’ सिनेमा पाहून लग्नाला होकार दिला होता. तर सागरिकाच्या कुटुंबियांनी देखील झहीरचं मराठी बोलणं पाहून लग्नासाठी हो म्हटलं होतं. सागरिका आणि झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या २०१६ पासूनच मीडियात येत होत्या. अखेरीस त्यांनी २४ एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला. सागरिका ही खऱ्या आयुष्यात देखील हॉकी प्लेअर होती. तसेच तिचा भाऊ देखील हॉकी प्लेअर आहे.
YJHD: ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमागृहात घालतोय धुमाकूळ; हा चित्रपट पुन्हा एकदा करणार मोठा पराक्रम!