प्रसिद्ध थिएटर आर्टिस्टचं निधन, अनेक दिवसांपासून देत होते दुर्धर आजाराशी लढा
हिंदी रंगभूमीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. रंगभूमीवरील दिग्गज अभिनेता आलोक चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त सिग्मा उपाध्याय यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून आलोक चॅटर्जी काही दुर्धर आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्या शरीरात कसलं तरी इन्फेक्शन झालं होतं. शिवाय त्यांच्या शरीरातील काही भाग सुद्धा निकामी झाले होते. यामुळेच अभिनेता आलोक चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांचे आज पहाटे निधन झाले.
भोपाळचे थिएटर कलाकार बलेंद्र बाळू यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले “काल रात्री (सोमवारी- ०६ जानेवारी) ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. शिवाय, ते अनेक आजारांनी ग्रासलेलेही होते. त्यांचे पित्ताशयही काढून टाकण्यात आले होते. किडनी आणि स्वादुपिंडातही समस्या होत्या. काल त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना बन्सल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते इरफान खान यांच्याशीही आलोक चॅटर्जी यांची घट्ट मैत्री होती. या दोघांनी 1984 ते 1987 या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिक्षण घेतले. या दोघांनीही तीन वर्षे नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. आलोक चॅटर्जी हे भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या अभिनयातील समर्पण आणि प्रतिभेचे नाट्यविश्वाने नेहमीच कौतुक केले. या अभिनेत्याने अनेक मोठ्या नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी आपल्या अभिनयातून विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
एक खून अनेक आरोपी, सुभेदारांच्या जावयाच्या हत्येचं रहस्य उलगडणार; ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर भेटीला