
2023 मध्ये रामायणावर आधारित आदीपुरुष चित्रपट रुपेरी पडद्यावर आला होता. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. आता या वर्षी दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणबीर कपूर राम(Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेच्या भूमिकेत आणि यश (Yash) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल आणखी एक अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री आता लारा ( Lara Dutta) ‘रामायण’ कैकयीच्या भुमिकेत दिसणार आहे तर, अॅनिमल चित्रपटातुन पुन्हा लाईमलाईट मध्ये आलेला ‘बॉबी देओल’लाही (Bobby Deol)महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहे.
[read_also content=”12वी फेल’नंतर आता ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात झळकणार विक्रांत मेसी, गोध्रा हत्याकांडावरआधारित सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीस https://www.navarashtra.com/movies/aftger-12th-fail-now-sabarmati-report-become-vikrant-messy-next-film-nrps-498481.html”]
‘रामायण’ चित्रपटात कैकेयीची भूमिका साकारण्यासाठी लारा दत्तासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पिंकविलाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ‘नितेश तिवारीला अशा कलाकारांना कास्ट करायचे आहे जे रामायणातील पात्रे साकारण्यास सक्षम आहेत. राजा दशरथाची पत्नी कैकेयीची भूमिका साकारण्यासाठी लारा दत्ता परिपूर्ण आहे, असा त्याचा विश्वास आहे. हे एक महत्त्वाचे पात्र आहे. नितेश तिवारीच्या चित्रपटासाठी लाराही उत्साहित आहे.
‘रामायण’ चित्रपट तीन भागात असेल. पार्ट वनमध्ये लाराची मोठी भूमिका असणार आहे. मार्चमध्ये पहिल्या शेड्यूलमध्ये ती रणबीर कपूरसोबत शूटिंग सुरू करू शकते. कैकेयी वगळता इतर भूमिकांसाठी कास्टिंग सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी आणि त्यांची टीम बॉबी देओलला कुंभकर्णाच्या भूमिकेत कास्ट करू इच्छित आहे. मात्र, त्याला बॉबीकडून उत्तर मिळालेले नाही. सूत्राने सांगितले की, ‘बॉबीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. तो चित्रपट करणार की नाही हे येत्या २ महिन्यात ठरवेल. अॅनिमलच्या यशानंतर बॉबीकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. येत्या काही महिन्यांत तो यातून निवड करेल.
हनुमाना भुमिकेसाठी सनी देओलशी बोलणी सुरू आहेत. हनुमानाच्या भूमिकेत दारा सिंग यांनी ज्याप्रकारे त्यांच्या भुमिकेची छाप सोडली होती त्याप्रकारे सनी देओलच्या त्याच्या भुमिकेची छाप सोडू शकतो. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.