परिणीती आणि राघव वेडिंग व्हिडीओ : नुकताच बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा जल्लोषात पार पडला. या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या दोघांच्या लग्नाच्या फोटो चाहत्यांनी त्याचबरोबर बॉलीवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या फोटोला कमेंट्स करून भरभरून प्रेम दिले. नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. दोघांचे लग्न उदयपूरमध्ये पार पडले. २.२१ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये वर राजाच्या प्रवेशापासून ते सात फेऱ्यांपर्यंतचा प्रत्येक क्षण दाखवण्यात आला आहे.
I never thought I would ever receive a gift like this, but I guess my singer wife loves surprising me! ? I am truly overwhelmed .. your voice has now become the soundtrack of my life .. our life .. thank you Mrs. Chadha. I consider myself the luckiest man in the world to have… pic.twitter.com/WcDEjLyttb
— Raghav Chadha (@raghav_chadha) September 29, 2023
लग्नाचा व्हिडीओ शेअर करताना राघव चढ्ढा यांनी लिहिले की, मला कधी असे गिफ्ट मिळेल असे वाटले नव्हते. पण मला वाटते की माझ्या गायक पत्नीला मला आश्चर्यचकित करणे आवडते. मी खरोखर भारावून गेलो आहे. तुझा आवाज आता माझ्या आयुष्याचा साउंडट्रॅक बनला आहे. माझ्या आयुष्याचा. धन्यवाद श्रीमती चढ्ढा… मी स्वतःला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी २४ सप्टेंबर रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले. या शाही जोडप्याच्या लग्नाची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर होता, परंतु लग्नाच्या विधींशी संबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यास सक्त मनाई होती. राघव चढ्ढा आणि परिणीती दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते. दोघांनीही परदेशात एकत्र शिक्षण घेतले. यानंतर २०२२ मध्ये त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या जोडप्याची प्रेमकहाणी सुरू झाली.