Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raanti Poster : रावडी अंदाज अन् नजरेत आग… शरद केळकरचा ‘रानटी’मधला थरारक लूक चर्चेत

सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये नवनवीन विषय हाताळून वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. मराठमोळा बॉलिवूड अभिनेता शरद केळकर अशातच सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. लवकरच अभिनेता शरद केळकर ‘रानटी’नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 15, 2024 | 03:23 PM
‘रानटी’ चित्रपटात प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार ? स्वत: दिग्दर्शकांनीच सांगितलं

‘रानटी’ चित्रपटात प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार ? स्वत: दिग्दर्शकांनीच सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

Sharad Kelkar Upcoming Movie : सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये नवनवीन विषय हाताळून वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. मराठमोळा बॉलिवूड अभिनेता शरद केळकर अशातच सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. लवकरच अभिनेता शरद केळकर ‘रानटी’नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाची घोषणा करत पोस्टर शेअर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा – तुटलेलं हृदय अन्…; बिग बॉसच्या घरातून आर्या जाधवला काढल्यानंतरची पहिली पोस्ट चर्चेत

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते किंवा हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’असतो. या कथेचा नायकच ‘रानटी’बनला. म्हणून… “काही ‘रानटी’असतात, तर काही बनतात! शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’चित्रपटात पहायला मिळणार आहे.

 

शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही, हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय. त्याचा ‘रानटीपणा’नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. भूमिकेबद्दल शरद केळकरने सांगितलं की, “अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.”

हे देखील वाचा – रितेश देशमुख देणार आज स्पर्धकांना सरप्राईज! घरातील सदस्य झाले भावुक

चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ साॅइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्‍या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे. सिनेमाची कथा हृषिकेश कोळीने लिहिली असून अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि नावावरून ‘रानटी’प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे नक्की.

 

Web Title: Bollywood and marathi actor sharad kelakar starrer raanti movie first poster and motion poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 03:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.