फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया
बिग बॉस मराठी : महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीचा रिऍलिटी शो बिग बॉस मराठी सध्या प्रचंड चर्चेत आहे. या बिग बॉस मराठी सिझन ५ चा नवा होस्ट रितेश देशमुखच्या कामगिरीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सध्या या रिऍलिटी शोचा आठवा आठवडा सुरु आहे. यामध्ये अनेक स्पर्धक हे नॉमिनेट झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये राडा पाहायला मिळाला. यामध्ये दोघींच्या भांडणांमध्ये आर्याने निक्कीला कानशिलात मारल्यामुळे तिला शनिवारच्या भागामध्ये भाऊंच्या धक्कामध्ये तिला घराबाहेर काढण्यात आले आहे. आता रविवारच्या भागामध्ये रितेश देशमुख बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे.
रितेश देशमुख आज रविवारच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये घरातील सदस्यांना सरप्राईज देण्यात आले आहे. रितेश देशमुखने घरामधील सदस्यांच्या घरी व्हिडीओ कॉल करून त्यांना परिवारासोबत बोलण्याची संधी दिली आहे. यावेळी जान्हवीचा मुलगा तिच्यासोबत व्हिडीओ कॉल वर बोलताना दिसला, त्याचबरोबर पंढरीनाथ म्हणजेच पॅडीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरामधील सर्व सदस्य हे भावुक होताना दिसले. त्यामुळे आज भावुक सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
बिग बॉस मराठी सिझन ५ च्या सातव्या आठवड्यामध्ये वैभव, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी, अभिजित सावंत हे स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये आर्या जाधव सुद्धा घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली होती परंतु तिने निक्की तांबोळीच्या कानशिलात मारल्यामुळे तिला घराबाहेर करण्यात आले आहे. आज आणखी एक सदस्य घराबाहेर होणार आहे, यामध्ये वर्षा उसगावकर किंवा वैभव यांच्यामधील कोणीतरी बाहेर जाऊ शकत असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला. उरलेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.