अक्षय कुमार- अर्शद वारसीची हटके कॉमेडी पुन्हा अनुभवायला मिळणार, 'जॉली एलएलबी ३'ची रिलीज डेट जाहीर
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) स्टारर बहुप्रतिक्षित कोर्टरुम ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचाच अर्थ ‘जॉली एलएलबी ३’ (Jolly LLB 3) ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. ‘जॉली एलएलबी’च्या दोन्हीही पार्टला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. दोन्हीही चित्रपटांना दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘जॉली एलएलबी’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली…
दरम्यान, ‘जॉली एलएलबी’च्या पहिल्या दोन्ही पार्टमधून अक्षय आणि अर्शद या जोडीने वकिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. आता पुन्हा ‘जॉली एलएलबी ३’ मधून अक्षय आणि अर्शद कोर्टरुममध्ये एकमेकांसमोर येणार आहेत. काही तासांपूर्वीच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर अक्षय आणि अर्शदच्या चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांना कॅप्शन दिलंय की, “अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर ठरली आहे. व्हायकॉम १८ स्टुडिओजकडून चित्रपटाची रिलीज डेट ठरवण्यात आली आहे. ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज करण्यात आला आहे. ‘जॉली एलएलबी ३’चित्रपट हा ‘जॉली एलएलबी’च्या फ्रेंचायझीमधला एक प्रसिद्ध चित्रपट आहे.”
‘जॉली एलएलबी’चा तिसरा पार्ट येणार अशी घोषणा झाली तेव्हापासूनच चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. पहिले दोन्हीही भाग बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले, त्या प्रमाणेच आता तिसरा भागही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला आणि सुशील पांडे हे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचा बराचसा भाग राजस्थानमधील अजमेर येथे शूट करण्यात आला आहे. या कोर्टरूम ड्रामाचे पहिले दोन भाग सुपरहिट झाले आहेत. आता कोर्टरूम ड्रामाचा तिसरा भाग देखील लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. सुभाष कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘जॉली एलएलबी ३’मध्ये अक्षय कुमार जॉली मिश्रा आणि अर्शद वारसी जॉली त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी देखील दोन्ही भागांमध्ये अक्षय आणि अर्शद प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते.
समिधा बनली उल्का, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर
दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा २०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अर्शद वारसी दिसला होता. तर बोमन इराणी यांनी चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. याशिवाय चित्रपटामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत अमृता अरोरा दिसली होती. ‘जॉली एलएलबी’मध्ये सौरभ शुक्ला यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली केली होती. ‘जॉली एलएलबी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यावेळी चित्रपट १३.५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. चित्रपटानं जगभरात ४३ कोटींची कमाई केली होती. या यशानंतर ‘जॉली एलएलबी-2’ हा चित्रपट बनविण्यात आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच ‘जॉली एलएलबी-2’ अमृता अरोराच्या जागी हुमा कुरेशीनं घेतली होती. या चित्रपटात देखील सौरभ शुक्लाचे पात्र बदलले नाही. मात्र यात अनु कपूर नावाचा एक नवीन चेहरा वकील म्हणून दिसला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘जॉली एलएलबी-२’ ८३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटानं जगभरात १८२ कोटींहून अधिकची कमाई केली होती.