कुणी नाकाचा आकार बदलतात, तर कुणी ओठ; बोटॉक्स सर्जरी नेमकं आहे तरी काय? अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहतेही चकित
सुंदर आणि नितळ त्वचा असावी असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. डागरहित गोरा पान चेहरा असावा असं फक्त सर्वसाधारण तरुणींनाच नाही तर सिनेइंडस्ट्रीत काम करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्रींना देखील हेच वाटतं. वयानुसार होणारे तारुण्यातील बदल हे अभिनेत्रींच्या करियरसाठी मोठं आव्हान ठरत आहेत ही सिनेविश्वातील मोठी शोकांतिका असल्याचं प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं आहे. सुंदर दिसण्यासाठी अनेक जण बोटॉक्स सर्जरीचा पर्याय निवडतात. मात्र सुंदर दिसण्याच्या या हव्यासापोटी अनेकांचा ऑपरेशन टेबलबवर जीव ही जातो. हे अतिशय भयंकर आहे. असं मत बॉलीवूड अभिनेत्री संदीपा धर हिने व्यक्त केलं आहे.
नुकतंच एका मुलाखतीत टेली कक्करशी बोलताना संदीुपाने इंडस्ट्रीतल्या रुपेरी पडद्यामागच्या काळ्या बाजूबाबत स्पष्टपणे मत मांडलं आहे. संदीपा म्हणते की, एका ठरावीक काळानंतर तुम्ही तुमच्या शरीरात नैसर्गिक बदल हे होतातंच. त्यामुळे वय वाढत जात असल्याने तुमचा 21 वर्षाच्या तरुणीसाठी सारखा राहणार नाही. वयानुसार तुमच्या शारीरिक सौंदर्यात बदल होतात, हे बदल तुम्हाला स्विकारता यायला पाहिजेत. मात्र सिनेविश्वात तसं होत नाही. अभिनेत्रींच दिसणं हे त्यांच्या करियरसाठी अत्यंत महत्वाची बाब ठरत आहे ही मोठी समस्या आहे असं देखील संदीुपा म्हणते.
संदीपा पुढे असंही म्हणाली की, बोटॉक्स सर्जरीला मी प्राधान्य देत नाही. मी तुम्ही तुमचं सौंदर्य हे नैसर्गिकपणे छान ठेवण्याचा प्रयत्न करु शकता. जसं जसं वय वाढतं त्यानुसार चेहऱ्य़ावर सुरकुत्या येणं ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे. वय सिनेविश्वातील कलाकार हे कायमच तरुण आणि सुंदर दिसायला पाहिजेत अशी चुकीची अपेक्षा केली जाते. दिसणं आणि तुमचं काम या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला माझ्यावर विश्वास आहे की, माझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेष माझ्या भुमिकेला चमक आणेल. त्यामुळे मी कधीही सुंदर दिसण्यासाठी बोटोक्स सर्जरीला प्राधान्य देणार नाही. असं अभिनेत्री संदीपा धर हिने सांगितलं आहे.ॉ
बोटॉक्स सर्जरी ही एक कॉस्मेटीक प्रक्रिया आहे. या सर्जरींमुळे चेहऱ्यैावरच्या सुरकुत्या कमी होतात. वयानुसार येणारं वृद्धत्व यामुळे दिसून येत नाही. मात्र सर्जरीमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. अनेक सिनेकलाकारांनी वयामुळे दिसणारं वृद्धत्व कमी करण्यासाठी बोटोक्स सर्जरी केली आहे. या सर्जरीमध्ये इंजेक्शद्वारे हऱ्याच्या स्नायूंमध्ये प्रोटीन सोडले जातात. ज्यामुळे स्नायू आकुंचन होण्यापासून थांबतात. या सर्जरीमुळे अर्धांगवायु होण्याची शक्यता देखील जास्त असते.