20 व्या वर्षी पत्नीनं सोडली साथ, कपडे शिवण्याचं केलं काम; राजपाल यादव कसे झाले 'कॉमेडी किंग', जाणून घ्या संघर्षमय प्रवास
दमदार कॉमेडीच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणे, काही सोप्पे काम नाही. असे क्वचितच कलाकार आहेत, ज्यांनी कॉमेडीचा अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव होय… राजपाल यादवने आपल्या अभिनयाच्या आणि कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आज राजपाल यादवचा वाढदिवस. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल.
अनेक अफेयर्सनंतरही सलमान खानने का केलं नाही लग्न? अखेर वडिलांनी सांगितलं सिंगल राहण्यामागचं कारण
१६ मार्च १९७१ रोजी राजपाल यादवचा जन्म झाला आहे. आज राजपाल आपला ५४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. राजपालचा जन्म उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कुलरा शहरात झाला आहे. राजपालचे असे अनेक पात्र आहेत, जे आजही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. विनोदी जगताचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा राजपाल यादव गेल्या २५ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहेत. राजपाल यादवने आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भुल भुलैय्या’ चित्रपटातील ‘छोटा पंडित’या भूमिकेने राजपालला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. राजपालने आपले बालपण गरिबीत घालवले. टेलरिंगचे काम करून त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
राजपाल यादवने आपल्या टॅलेंटच्या आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान प्रस्थापित करत तो आज अभिनयाचा बादशहा बनला. राजपाल यादवचे बालपण एका छोट्याशा गावात गेले आणि तिथूनच त्याचे स्वप्न सत्यात हळूहळू उतरु लागले. राजपाल यादवला बालपणापासूनच आर्मीमध्ये भरती होण्याची आवड होती. पण उंची नसल्यामुळे त्याचे काही स्वप्न सत्यात उतरले नाही. त्यानंतर राजपाल यादवने ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या कंपनीमध्ये अभिनेता टेलर म्हणून काम करत होता. त्या कंपनीमध्ये नोकरी लागल्यानंतर कुटुंबीयांनी लहान वयातच त्याचे लग्न लावून दिले होते. पण त्याच्या पत्नीचे नवजात बालकांना जन्म देताना तिचे निधन झाले. त्यामुळे यादव कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. पण, त्याच्या पत्नीचे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच निधन झाले होते. तर, राजपालने २००३ मध्ये राधासोबत दुसरे लग्न केले असून त्यांना एक मुलगीही आहे.
‘देवमाणूस’ परत येतोय! टीझर प्रदर्शित; किरण गायकवाड कमबॅक करणार?
यानंतर राजपाल यादव लखनऊमध्ये राहू लागला आणि त्याचे अभिनयाचे प्रशिक्षण येथूनच सुरू झाले. रंगभूमीवर काम असताना, राजपाल यादवला असं वाटलं की त्याला आयुष्यभर हेच करायचे आहे. यानंतर राजपाल यादवने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि तो अभिनेता बनला. अभिनयाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, राजपाल यादव मुंबईत आला. १९९९ मध्ये राजपाल यादवचा ‘दिल क्या करे’ नावाचा पहिला चित्रपट रिलीज झाला. तथापि, हा चित्रपट राजपालच्या कारकिर्दीत कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकला नाही. पण या चित्रपटामुळे राम गोपाल वर्मा यांची राजपालसोबत ओळख झाली. राम गोपाल वर्मा त्यांच्या ‘जंगल’ चित्रपटासाठी कास्टिंग करत होते. या चित्रपटात राजपाल यादवचीही भूमिका होती. २००० मध्ये, जंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि राजपालच्या अभिनयाने लोकांचे मन जिंकले. राजपाल यादवचा चित्रपट प्रवास येथून सुरू झाला.
प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक, म्हणाला, “ “एकट्या”ने हे धाडस करणं जिकीरीचं, पण… ”
‘हंगामा’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘चुप चुप के’, ‘भूल भुलैया’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’, ‘ढोल’, ‘मैं, मेरी पत्नी और वो’, ‘मुझसे शादी करोगे’, ‘भूतनाथ’सह अनेक मोठ्या चित्रपटात राजपाल यादवने काम केले आहे. राजपाल यादव एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम विनोदी कलाकारही आहे. राजपाल यादवने काही चित्रपटांमधूनच बॉलिवूडमध्ये एक खास स्थान मिळवले. तसेच, त्याने विनोदाच्या जगात असे काम केले की आजही लोक त्याच्या पात्रांचे वेडे आहेत. राजपाल यादवने आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये असा कोणताही मोठा स्टार नाही ज्याच्यासोबत राजपाल यादवने चित्रपट केला नाही.
Uff! यह नूर… ओठांवरच्या गडद लाल रंगाने, मुनमुनने तरुणांचे हृदय काबीज केले