
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री-निर्माती सामांथा रूथ प्रभू यांच्या नवीन चित्रपट ‘मा इंती बंगाराम’ चा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बऱ्याच काळापासून प्रेक्षक वाट पाहत होते. आता, आजचा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे. टीझरमध्ये भावनांपासून ते कृतीपर्यंत सर्व काही दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझर प्रेक्षकांना आवडला आहे, आणि त्यांनी काय प्रतिसाद दिले जाणून घेऊयात.
आदर्श सून म्हणून सामंथा दिसली अॅक्शन मोड मध्ये!
सामंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. १ मिनिट ४७ सेकंदाच्या या टीझरची सुरुवात एका महिलेने (सामंथा) तिच्या पतीसह तिच्या सासरच्या घरी येण्याने होते. ती एका आठवड्यात त्यांचे मन जिंकण्याचे आत्मविश्वासाने वचन देते. आदर्श सून बनण्याच्या प्रयत्नात, ती सखोल चौकशी सुरू करते. परंतु, ती तिच्या सासरच्यांसमोर निर्दोष आणि शांत दिसते. टीझरमध्ये सामंथा एका शक्तिशाली अॅक्शन भूमिकेत दिसत आहे. ती एकट्याने गुंडांना संपवताना, भयंकर गोळीबार करताना आणि नंतर मृतदेहांची विल्हेवाट लावून रक्तपात लपवताना दिसते. टीझर शेअर करताना सामंथाने कॅप्शनमध्ये लिहिते, “हे धाडसी सोने आहे.”
सामंथाचे पती राज निदिमोरू चित्रपटाचे निर्माते
या चित्रपटाचे निर्माते सामंथाचे पती राज निदिमोरू आहेत आणि दिग्दर्शन नंदिनी रेड्डी यांनी केले आहे. “ओह! बेबी” नंतर नंदिनी आणि सामंथ पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात गुलशन देवैया आणि दिगंत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, ज्येष्ठ अभिनेत्री गौतमी आणि मंजुषा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
चाहत्यांना टीझर आवडला
टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक वापरकर्त्यांनी सामंथाच्या मोठ्या पडद्यावर परत येण्याबद्दल आनंद व्यक्त केला. एका चाहत्याने लिहिले की टीझरने त्यांना थक्क केले. आता चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसऱ्याने चाहत्याने लिहिले की ॲक्शन जबरदस्त आहे. अनेक चाहत्यांनी सामंथाला ॲक्शनमध्ये पाहून आनंद व्यक्त केला आहे. चाहत्यांना बसमधील सामंथाचा अॅक्शन सीन सर्वात जास्त आवडला आहे, जिथे ती साडी घालून जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.