११ वर्षात हातावर मोजण्या इतके सुपरहिट चित्रपट; तरीही करोडोंचा मालक, राजेशाही थाटात जगतो टायगर श्रॉफ
बॉलिवूड सुपरस्टार जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. ज्याप्रमाणे जॅकी श्रॉफ यांना स्टारडम आहे, तितकी प्रसिद्धी अद्याप टायगर श्रॉफला अद्याप मिळवता आली नाही. ‘ॲक्शन हिरो’ म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या टायगर श्रॉफचा आज वाढदिवस आहे. टायगर श्रॉफ आज ३४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. ११ वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये, १० ते १५ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याने हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच हिट सिनेमे दिलेय. पण तरीही आज ‘ॲक्शन हिरो’ करोडोंचा मालक आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या नेटवर्थबद्दल…
आले किती गेले किती संपले भरारा… कित्येक दशकांपासून अगदी तसाच आहे माधुरीच्या सौंदर्याचा दरारा
अभिनयातच नाही तर, मार्शल आर्टमध्येही कुशल असलेल्या टायगरने आपल्या बालपणापासूनच मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं होतं. टायगर कायमच आपल्या खासगी आयुष्याबाबत मौनच बाळगून असतो. टायगरने ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. ‘ॲक्शन हिरो’ म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या टायगर श्रॉफचं खरं नाव, टायगर नाही. त्याचं खरं नाव ‘जय हेमंत श्रॉफ’ असं आहे. मात्र जेव्हा टायगरला फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करायचे होते, तेव्हा त्याने स्वतःचं नाव ‘टायगर’ ठेवलं. टायगरला बालपणी खेळ, मार्शल आर्ट्स आणि डान्समध्ये जास्त आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याने मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
टायगरचा पहिला चित्रपट ‘हिरोपंती’ होता, जो २०१४ मध्ये रिलीज झाला होता. त्याच्या ह्या चित्रपटानेच त्याला कमालीची प्रसिद्धी दिली. टायगरने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं. पहिल्या चित्रपटानंतर त्याला लोकांनी फार ट्रोल केले. काहींनी त्याच्या गुलाबी ओठांची खिल्ली उडवली, तर काहींनी त्याला मुलींसारखा दिसतो म्हणून हिणवले. परंतु स्वतःवर मेहनत करत टायगरने ‘ॲक्शन हिरो’ म्हणून एक ओळख निर्माण केली. तो एक चांगला डान्सरही आहे. टायगर श्रॉफ इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी आहे जो सिगारेट किंवा दारूचे सेवन करत नाही. एकंदरीत असे म्हणता येईल की टायगर आजच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतो. टायगर मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता आहे. २०१४ मध्ये त्याला तायक्वांदोमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ देण्यात आला होता.
हळद लागली नवरदेवा… गोवारीकरांच्या दारी सजलाय लग्नाचा मांडव, कोणार्क- नियतीच्या हळदीचे Photos Viral
टायगर श्रॉफच्या वडिलांचे नाव जॅकी श्रॉफ, आईचे नाव आयेशा श्रॉफ तर बहिणीचे नाव कृष्णा श्रॉफ आहे. टायगर श्रॉफचं मुंबईमध्ये 8BHK अपार्टमेंट असून त्याची किंमत ७ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफची एकूण संपत्ती २४८ कोटी रुपयांची आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफ एका चित्रपटासाठी २० ते ४५ कोटी रुपये घेतो. टायगरकडे BMW 5 सीरिज, रेंज रोव्हर, जग्वार आहे. ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय त्याने मुंबईत सी- फेसिंग अपार्टमेंटही खरेदी केला आहे. याआधीही त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे दोन फ्लॅट होते.