'सौंदर्याची राणी, जिची दुनिया दिवाणी.' ही व्याख्या खरंच माधुरी शिवाय आणखीन कुणासाठी जाणे शक्यच नाही. अनेक पिढ्यांच्या हृदयावर हक्क गाजवणारी माधुरी खऱ्या अर्थाने रूपाची राणी आहे. माधुरी नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली असते. नवनवीन Photoshoot तिच्या चाहत्यांशी शेअर करतच असते.
माधुरी दीक्षितने शेअर केले तिचे नवे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या @madhuridixitnene या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे.
या photoshoot मध्ये अभिनेत्रीने श्वेत रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. या आऊटफिटमध्ये माधुरी फार सुंदर दिसत आहे.
माधुरीचा साज आणि शृंगार तर प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. देशातील आजचे तरुणही त्या रूपाचे चाहते आहेत. त्याची झलक कॉमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या या साज शृंगाराचे कौतुक भरभरून करण्यात आले आहे. मुळात, माधुरीच्या रूपाचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Soft waves, classic drapes, and a bow that steals the show!' नमूद केले आहे.