(फोटो सौजन्य-Instagram)
अंबानी कुटुंबातील अनेक सदस्यांना फोर सीझन्स हॉटेल जॉर्ज V येथे पाहण्यात आले आहे, ज्यामुळे ते पॅरिसमध्ये असताना या 5-स्टार हॉटेलचा आधार घेऊन ते येथे काम करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी सध्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी फ्रान्सच्या राजधानीत दाखल झालेले दिसून येत आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल यांच्यासोबत शुक्रवारी ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा पाहताना फोटो काढण्यात आले आहेत जे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. तसेच याचदरम्यान त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची सून राधिका मर्चंट यांच्यासोबत सामील झालेले दिसून येत आहेत, ज्यांचे लग्न या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत झाले ज्याची चर्चा अजूनही सर्वत्र सुरु आहे.
ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट फोर सीझन्स हॉटेल जॉर्ज व्ही, पॅरिसमध्ये प्रवेश करताना दिसतात. हे दोघेही या व्हिडीओमध्ये हे दोघे एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत आहेत. याचदरम्यान, नीता अंबानी देखील या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसल्या. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षांची 142 व्या IOC अधिवेशनात भारतातून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सदस्य म्हणून एकमताने त्यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. तसेच, काल ऑनलाइन समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी फोर सीझनच्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसले.
फोर सीझन्स हॉटेल जॉर्ज V, पॅरिस
पॅरिसमधील फोर सीझन्स हॉटेल जॉर्ज V 5-स्टारला खरा पॅरिसियन आयकॉन म्हटले जाते. ऐतिहासिक Champs-Elysées च्या अगदी जवळ स्थित, हे शहराच्या सर्वात प्रतिष्ठित यादीमधील हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. अनेक मोठे कलाकार आणि उधोजकांसाठी हे लक्झरी हॉटेल खूप चर्चेत आहे.या हॉटेल मधील देखावा पाहून अनेकांचे डोळे टिपतील असे याचे रहस्य आहे. तसेच अनेक मोठं मोठे कलाकार या हॉटेलमध्ये हजेरी लावून जात असतात.
फोर सीझन्स हॉटेल जॉर्ज V 5-स्टार हे 1928 मध्ये पहिल्यांदा उघडले. आज, ते त्याच्या अप्रतिम आर्किटेक्चर आणि इंटीरियर डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. हॉटेलमध्ये 244 सुव्यवस्थित खोल्या आहेत, ज्यात पॅरिसियन लक्झरी आधुनिक सुखसोयींचे मिश्रण असलेल्या सूट्सचा समावेश आहे. हॉटेलच्या वेबसाइटनुसार, सर्वात मूलभूत खोल्या प्रति रात्र ₹1.8 लाख पासून सुरू होतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमुळे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देतेत, ज्यात 5-स्टार स्पा, पूल, सौना, ऑन-साइट बुटीक, दररोज दोनदा हाऊसकीपिंग, स्वच्छता किट आणि बरेच काहीचा यामध्ये समावेश आहे.