(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
तब्बल ५ दशके अभिनेता रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटांची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, ज्याचा अंदाज त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेट्टयानच्या यशावरून सहज लक्षात येऊ शकतो. दरम्यान, रजनीकांतच्या पुढच्या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान 3 दशकांनंतर त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया कोणत्या चित्रपटामध्ये हे कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटासाठी आमिरने केली हातमिळवणी
रजनीकांतच्या आगामी ‘कुली’ या चित्रपटासाठी अभिनेता आमिर खानला अप्रोच केले जात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून चित्रपट इंडस्ट्रीत होत आहे. मास्टर सारखे उत्कृष्ट चित्रपट करणारे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या या चित्रपटाची तयारी जोरात सुरू आहे. डेक्कन हेराल्डच्या बातमीनुसार, आमिरने रजनीकांतच्या कुलीमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात बॉलीवूडचा सुपरस्टार त्याच्या कॅमिओ रोलसाठी सज्ज झाला असून काही काळानंतर तो त्याचे शूटिंगही सुरू करणार आहे. अभिनेत्याची कॅमिओ भूमिका खूपच छोटी असली तरी ती दुप्पट स्फोटक असणार आहे. चित्रपटाच्या जवळच्या सूत्राने ही माहिती दिली आहे.
जर असे घडले तर चित्रपट रसिकांसाठी हे नक्कीच एक मोठे आश्चर्य असणार आहे, या दोघांची जोडी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड खळबळ माजवण्यास पुरेशी ठरणार आहे. लोकेश कनागराजच्या कुली चित्रपटात नागार्जुन, श्रुती हासन आणि सत्यराज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हे देखील वाचा- Vettaiyan Worldwide Collection: ‘वेट्टयान’ने चाहत्यांचे जिंकले मन, बॉक्स ऑफिसावर करतोय जोरदार कमाई!
30 वर्षांपूर्वी या सिनेमात दिसले होते एकत्र
रजनीकांत यांचा मल्टीस्टारर चित्रपट ‘कुली’ पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्याचा टीझर आणि पोस्टर आधीच समोर आले आहेत. या चित्रपटाद्वारे आमिर खान आणि रजनीकांत यांची जोडी 30 वर्षांनंतर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची माहिती आहे. याआधी हे दोन्ही सुपरस्टार 1995 मध्ये आलेल्या ‘आतंक ही आतंक’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली. आता, कुली भविष्यात काय चमत्कार दाखवेल हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.