Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला कौतुक वाटते…’ संसदेत राघव चड्ढांची पितृत्व रजेची मागणी; पत्नी परिणीती चोप्राने व्यक्त केला अभिमान

राघव चड्ढा हे एक उत्तम वडील आणि पती आहेत, तसेच एक उत्तम नेतेही आहेत. राघव हे सातत्याने आपल्या लाखो देशवासियांच्या वतीने बोलतात आणि संसदेत त्यांचे प्रश्न मांडताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 01, 2026 | 11:54 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • संसदेत राघव चड्ढांची पितृत्व रजेची मागणी
  • पत्नी परिणीती चोप्राने व्यक्त केला अभिमान
  • सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
 

राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. देशवासीयांच्या हितासाठी ते नेहमी नवे मुद्दे उपस्थित करताना दिसतात आणि संसदेत ठामपणे मांडणी करतात. अलीकडे त्यांनी पितृत्व रजेचा मुद्दा उपस्थित करत भारतात पितृत्व रजा कायदेशीर अधिकार म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. आणि यावर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री परिणीती चोप्राने अभिमान व्यक्त केला आहे.

‘ही 6 मोठी कारणं…’ ज्यामुळे ‘Dhurandhar2’ला पाकिस्तानात मिळतोय जबरदस्त प्रतिसाद; बंदी असूनही पाहतायत चित्रपट

राघव चड्ढा काय म्हणाले?

संसदेत बोलताना राघव चड्ढा म्हणाले की, आपल्या देशात बाळाचा जन्म झाल्यावर आई-वडील दोघांनाही शुभेच्छा मिळतात, मात्र संगोपनाची जबाबदारी प्रामुख्याने आईवरच येते. सध्या आपल्या व्यवस्थेत केवळ मातृत्व रजेला मान्यता आहे, ही समाजाची मोठी कमतरता असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा कायदा वडिलांच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्या मान्य करत नाही, तेव्हा असा संदेश जातो की बाळाचं संगोपन ही केवळ आईचीच जबाबदारी आहे.”

 

परिणीतीला राघवचा अभिमान वाटतो

राघव यांच्या या भूमिकेवर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी राघव यांचा संसदेतला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली की, त्यांनी केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक जबाबदार वडील म्हणूनही हा मुद्दा मांडला आहे. परिणीतीने पुढे लिहिले की, “आज तुम्ही याबद्दल जेव्हा बोललात, तेव्हा ते केवळ पॉलिसीपुरते मर्यादित नव्हते; तर तुम्ही आपल्या मुलाचे संगोपन कसे करायचे आहे, याची ती जाणीव होती. न सांगताही तुम्ही नेहमी सोबत असता. तुम्हाला हे समजते की पालकत्व ही एकत्रित जबाबदारी आहे, ती कुणावर सोपवण्याची गोष्ट नाही. बाळाच्या जन्माने केवळ आईचाच नव्हे, तर वडिलांचाही जन्म होतो.”

Ranjith: मल्याळम दिग्दर्शकला अटक; लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाप्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

परिणीती पुढे म्हणाली, “अनेक माता अशा आहेत ज्या ही जबाबदारी एकट्याने पार पाडतात आणि त्यांचा आवाज अनेकदा ऐकला जात नाही. आज तुम्ही संसदेत त्यांच्यासाठी आवाज उठवला, आणि हीच ती जागा आहे जिथे त्याला सर्वाधिक महत्त्व आहे. जर यामुळे पालकांना, विशेषतः मातांना, पाठिंबा मिळाला, तर तो आपला खरा विजय ठरेल. तुम्ही एक उत्कृष्ट वडील आणि उत्तम नेते आहात. मी हे दररोज पाहते आणि आता संपूर्ण भारतही ते पाहील. मला तुमचा नेहमीच अभिमान राहील.”

 

Web Title: Aap mp raghav chadha demands paternity leave law in parliament parineeti chopra praised husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Bollywood
  • Parineeti Chopra
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.