(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या मालिकेत अभिनेता ताहा शाह बदुशा यांनी ताजदार नावाच्या नवाबाची भूमिका साकारली होती. मालिकेची कथा स्त्री पात्रांभोवती गुंफलेली होती पण ताहा शाह आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला. त्याचे चाहते त्याला ताजदार या नावाने हाक मारू लागले आहेत. अलीकडेच अभिनेता ताहा शाह एका नवीन प्रोजेक्टसाठी शूटिंग करताना दिसला. तसेच अभिनेत्याचा हा शूटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गायिका तुलसी कुमार सोबत दिसला अभिनेता
अभिनेता ताहा शाह अलीकडेच गायिका तुलसी कुमारसोबत शूटिंग करताना दिसला. गायिका तुलसी कुमार अनेकदा तिच्या सिंगल गाण्यांचे व्हिडिओ रिलीज करते आणि त्यात नवीन किंवा प्रसिद्ध कलाकारांनाही कास्ट करते. ताहा शाह तुलसीसोबत एका नवीन गाण्याचा व्हिडिओ शूट करत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे.
दृश्यात रोमान्स करताना दिसले
एका गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना, तुलसी आणि ताहा शाह पांढऱ्या पोशाखात एका दृश्याचे चित्रीकरण करत होते. या दृश्यात दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. हे दृश्य चित्रित करताना, दोघेही मध्येच हसतात. तुलसी कुमारची रोमँटिक सिंगल गाणी यापूर्वीही रिलीज झाली आहेत. ती टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची मुलगी आहे. तुलसी कुमारच्या गाण्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. लोक तिच्या आवाजाचे वेडे आहेत. हे गाणं काय आहे आणि हे पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्सुक आहेत.
ताहा शाह सोशल मीडियावरही सक्रिय आहे.
‘हीरामंडी’ या मालिकेव्यतिरिक्त, ताहा शाहने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही काम केले आहे. अभिनय क्षेत्रात पुढे काय करायचे आहे याबद्दल त्याच्याकडून सध्या काहीही माहिती नाही. पण आजकाल तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच तो येणाऱ्या नव्या वर्षात त्याचे नवनवीन चित्रपट देऊन येणार आहे. आणि चाहत्यांचा भरभरून मनोरंजन करणार आहे.