Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीच्या निधनानंतर 3 वर्षांनी सायरा बानोंचा खुलासा, लग्नाआधी असलेल्या दिलीप कुमारांच्या आजाराबाबत म्हणाल्या…

हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांची आज तिसरी पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक नोट शेअर केली आहे. काय आहे ती भावनिक पोस्ट ते पहा.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 08, 2024 | 04:50 PM
हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांची आज तिसरी पुण्यतिथी

हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांची आज तिसरी पुण्यतिथी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांची आज तिसरी पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक नोट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काही कथा सांगितल्या. यासोबतच त्यांनी असा खुलासाही केला की, लग्नापूर्वी त्यांचा दिवंगत पती आणि अभिनेता दिलीप कुमार गंभीर आजाराने ग्रस्त होता सायराने तिच्या पोस्टमध्ये दिलीप कुमार यांच्याशी संबंधित अनेक रंजक किस्से नमूद केले आहेत. त्याचवेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, लग्नापूर्वी दिलीप कुमार गंभीर आजाराने त्रस्त होते. यामुळे त्यांना रात्रभर झोपही लागली नाही.

दिलीप कुमार यांच्या जाण्यानंतर सायरा बानो यांच्यावर दुःखाचा सोंगाराचं कोसळला होता. आता त्या लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. पतीच्या निधनानंतर एकाकीपणाच्या वेदनांचा त्यांना सहान कराव्या लागल्या. सायरा या दिलीप कुमारसोबतच्या त्यांच्या आठवणी चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात. पतीसोबत घालवलेले क्षण आणि त्यांच्या चांगल्या आठवणी त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

आता दिलीप कुमार यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त सायराने लिहिले की, “मी ही चिठ्ठी लिहून माझे प्रेम व्यक्त करत आहे, जेणेकरून मी त्यांचे सर्व चाहते, हितचिंतक, प्रिय मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचे आभार मानू शकेन. जे आम्हाला प्रत्येक प्रसंगी पाठिंबा देतात. मला आनंद आहे की त्या सर्वांना आमची खास तारीख आठवते. ते जिथे पण आहेत त्या जगात ते सुखरूप राहावे यासाठी मी प्रार्थना करते.” कारण दिलीप साहेब हे सहा पिढ्यांचे अभिनेते आणि येणाऱ्या पिढ्यांचे प्रेरणास्थान आहेत.

सायरा बानोने आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितले की कोणते लोक दिलीप कुमारचे जवळचे मित्र होते. त्यांनी लिहिले, दिलीप साहब हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू साहब, अटल बिहारी वाजपेयी साहेब, नरसिंह राव साहब तसेच नामवंत वकील, अर्थतज्ञ आणि उद्योगपती इत्यादींचे खास मित्र राहिले आहेत. तसेच ते खेळाडूंचे कट्टर समर्थकही राहिले आहेत. फुटबॉल आणि क्रिकेट हे त्यांच्या अत्यंत आवडीचे खेळ होते.

सायरा बानोच्या पोस्टनुसार दिलीप कुमार यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनायचे होते. पण नशिबाने त्यांना अभिनेता बनवले. त्या पुढे लिहतात, ‘त्याला राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनायचे होते. मात्र, नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच वाढून ठेवले होते. साहेब हे सर्व काळातील महान अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे सर्व काही होते, तरीही खूप कमी लोकांना माहित होते की त्यांना निद्रानाश म्हणजे झोप न येण्याचा आजार होता. या आजारात व्यक्ती झोपू शकत नाही. त्यांच्यासाठी झोप लागणे फार अवघड गोष्ट आहे. सायरा पुढे लिहतात, आमच्या लग्नापूर्वी गोळ्या घेतल्यानंतरही ते सकाळपर्यंत जागे असायचे. मात्र, एकदा लग्न झाल्यावर आम्ही एकमेकांना पूरक ठरलो. यानंतर ते वेळेवर झोपू लागले. ‘सायरा, तू माझी झोपेची गोळी आहेस, तू माझी उशी आहेस’ असे प्रेमाने म्हणत त्यांनी मला एक गोंडस टोपणनावही दिले. आजही ते ज्या प्रेमाने आणि आपुलकीने हे बोलायचे ते आठवून मला हसू येते.

पुढे सायराने दिलीप कुमार यांच्या आयुष्याशी संबंधित एक रंजक प्रसंगही सांगितला. एक प्रसंग आठवत त्यांनी लिहिलं, ते संगीताचे प्रेमी होते. आमच्या घरी अनेकदा संगीताची मैफल आयोजित केला जायची. कलाकारांची अप्रतिम कला तिथे बघायला मिळाली. दिलीप साहेबांना काही वेळ शांत झोप लागावी म्हणून ते नेहमी अत्यंत कुशलतेने हळू हळू मैफिलीतून बाहेर पडत असत. एके दिवशी त्यांनी असेच केले. पण त्यांना माझ्याशिवाय झोप येत नव्हती. म्हणून त्यांनी एक चिठ्ठी लिहिली, ‘झोप येत आहे, काय सुचवाल आंटी ? 100% तो एक मजेशीर माणूस होता जो मला नेहमी ‘आंटी’ म्हणत हसायचा. तरीही, विनोद, हास्य आणि त्या हृदयावर लिहिलेल्या पानांच्या खाली खरे प्रेम लपलेले होते. दिलीप साहेब सदैव असतील… अल्लाह त्यांना आपल्या प्रेमात आणि आशीर्वादात ठेवो… आमेन.

 

Web Title: Actror dilip kumars third death anniversary today his wife shared an emotional note on instagram nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • Saira Banu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.