(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अहमदाबाद विमान अपघातात बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा चुलत भावाचे निधन झाले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या अपघातानंतर विक्रांत मेस्सीचे मन दुखावले गेले आहे. अभिनेत्याने स्वतःच सोशल मीडियावर त्यांच्या चुलतभावाच्या जाण्याबद्दलचे दुःख शेअर केले आहे. ज्यावर बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध लोकांनीही शोक व्यक्त केला आहे. या बातमीने अभिनेता निराश झाला आहे. अहमदाबाद दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचाचे निधन झाले आहेत. ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
विक्रांत मेस्सीने इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला
विक्रांत मेस्सी यांनी इंस्टाग्रामवर सांगितले की ही दुर्घटना त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. त्यांनी लिहिले की, ‘आज अहमदाबादमध्ये झालेल्या अकल्पनीय दुःखद विमान अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रियजनांसाठी माझे हृदय तुटले आहे. माझे काका क्लिफर्ड कुंडर यांनी त्यांचा मुलगा क्लाईव्ह कुंडर गमावला हे जाणून आणखी दुःख झाले, जो त्या दुर्दैवी विमानात काम करणारा पहिला अधिकारी होता. देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि प्रभावित झालेल्या सर्वांना शक्ती देवो.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.
Breaking: करिष्मा कपूरचा Ex Husband संजय कपूरचे निधन, पोलो खेळतानाच आला हार्ट अटॅक
बॉलीवूड अभिनेत्रीच्या मैत्रिणीनेही गमावला जीव
बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषची मैत्रिण प्रीती हिनेही अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावला आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या अपघातात तिने तिच्या मैत्रिणीला गमावले आहे. तिने तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिले, ‘प्रीती शांती पावो. माझ्या संवेदना चॅटर्जी कुटुंबासोबत आहेत. अहमदाबाद विमान अपघात.’ असे लिहून तिने देखील दुःख व्यक्त केले आहे.
Paisa Themb Themb Gala: सुपरहिट गाण्याचे सुपरहिट फ्युजन घेऊन अभिजीत सावंत प्रेक्षकांच्या भेटीला!
या सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक
अहमदाबाद विमान अपघातानंतर शाहरुख खान, आमिर खान व्यतिरिक्त, करीना कपूर, आलिया भट्ट, सनी देओल, अक्षय कुमार, दिशा पटानी, सोनू सूद, रितेश देशमुख यासारख्या चित्रपट सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे. या बातमीने संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे.