फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जिगरा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २ : बॉलीवूडचे अनेक नवे सिनेमे प्रेक्षक बॉक्स ऑफिसवर कमालीची कामगिरी करत आहेत. नुकतीच श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्टचा नवा सिनेमा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. आलिया भट्ट पुन्हा एकदा तिच्या दमदार अभिनयाने पडद्यावर परतली आहे. वेदांग रैनासोबतचा तिचा ‘जिगरा’ हा चित्रपट ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशीही ‘जिगरा’च्या कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे.
आलिया भट्टचा सिनेमाला दोन आणखी चित्रपट आमनेसामने आले आहेत. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ आणि ‘वेट्टियाँ’ यांच्यात संघर्ष असूनही, चित्रपटाने दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. Sacknilk च्या मते, ‘जिग्रा’ ने पहिल्या दिवशी ४.५५ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आपले खाते उघडले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा वेग थोडा वाढला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर ६.५० कोटींची जोरदार कमाई केली. अशा स्थितीत भारतातील ‘जिगरा’ने आता दोन दिवसांत एकूण ११.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘जिगरा’ने बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या दोन चित्रपटांचा सामना केला. ‘जिगरा’चे कलेक्शन सध्या राजकुमार रावच्या चित्रपटापेक्षा कमी आहे. ‘जिगरा’ने दोन दिवसांत ११.०५ कोटींची कमाई केली आहे, तर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’चे दोन दिवसांत १२ कोटींचे कलेक्शन झाले आहे. याशिवाय साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘वेट्टियाँ’ हा चित्रपटही १० ऑक्टोबरपासून थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करत असून शनिवारीच या चित्रपटाने २६.१ कोटींचा व्यवसाय केला.