Payal Rohatgi On Aliya Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhatt) सध्या तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. तिच्या बांधकाम सुरू असलेल्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ती चांगलीच संतापली होती आणि तिने याला खासगीपणाचे उल्लंघन म्हटले होते. आता या प्रकरणावर अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi) थेट आलियाला सुनावले आहे. पायलने म्हटले की, घराचे लोकेशन शेअर करणे खासगीपणाचे उल्लंघन होत नाही आणि लैंगिक संबंधांना खासगीपणा म्हणतात.
एका रिपोर्टनुसार, पायल रोहतगीने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आलिया भट्टवर जोरदार टीका केली. तिने आलियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा स्टंट केल्याचा आरोपही केला. पायलच्या पोस्टवरून ती आलियावर खूप नाराज असल्याचे स्पष्ट दिसते.
When Alia Bhatt called out paps and media publications for circulating the videos of her and Ranbir Kapoor’s new home, Payal Rohatgi disagreed with her and put out a weird statement on her Instagram.
Read here: https://t.co/HAkiawQTWC#DNAUpdates | #payalrohatgi | #aliabhatt pic.twitter.com/9uhiJTMIQW
— DNA (@dna) August 27, 2025
पायलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आलियाबद्दलच्या एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. ज्यामध्ये आलियाने तिच्या घराचे लोकेशन शेअर करणे हे खासगीपणाचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. यावर पायलने लिहिले, ‘हे खासगीपणाचे उल्लंघन मानले जाऊ शकत नाही. तुमच्या पतीसोबत किंवा इतर कोणत्याही पुरुषासोबतचे तुमचे लैंगिक संबंध ही तुमची खासगी बाब असते.’
पायल रोहतगी नेहमीच तिच्या परखड मतांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता आलिया भट्टच्या या प्रकरणावर तिने दिलेले हे स्पष्ट मत खूप चर्चेत आले आहे. आता यावर आलिया भट्ट काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. काही दिवसांपूर्वीच पायल रोहतगी तिच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद असल्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होती. नंतर तिचा पती संग्राम सिंह याने पुढे येऊन या सर्व बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अफवांमुळे पायल खूप अस्वस्थ झाली होती.