Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅटलीच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज; अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले रिटर्न गिफ्ट!

अल्लू अर्जुन त्याच्या २२ व्या चित्रपटासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते अ‍ॅटलीसोबत काम करणार असल्याचे समोर आले आहे. आज ८ एप्रिल रोजी, अभिनेत्याच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त, ही खास घोषणा करण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 08, 2025 | 12:25 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

‘पुष्पराज’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत आग लावण्यास सज्ज झाला आहे. आज पॅन इंडिया स्टार अल्लू अर्जुनचा ४३ वा वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी, त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, जो अ‍ॅटली दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता, परंतु आज या खास प्रसंगी निर्मात्यांनी त्याची अधिकृत घोषणा केली आहे. आणि चाहत्यांना खुश करून टाकले आहे.

काय आहे चित्रपटाचे शीर्षक?
आज, ८ एप्रिल २०२५ रोजी, प्रॉडक्शन हाऊस सन पिक्चर्सने X वर व्हिडिओ शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. अल्लू अर्जुनने दक्षिणेकडील दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत एका ‘अद्भुत’ प्रकल्पासाठी काम केले आहे जो कधीही न पाहिलेला विज्ञानकथा असल्याचे म्हटले जात आहे. ‘AA22’ असे तात्पुरते नाव या चित्रपटाचे ठेवण्यात आले आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा अर्जुनच्या ४३ व्या वाढदिवशी मंगळवारी करण्यात आली आहे.

शाहरुख खान फॅमिलीसोबत नव्या घरात शिफ्ट झाला, ‘मन्नत’पेक्षा अर्ध आहे किंग खानचं नवीन अपार्टमेंट

निर्मात्यांनी शेअर केला व्हिडीओ
हा अल्लू अर्जुनचा २२ वा आणि अ‍ॅटलीचा सहावा चित्रपट आहे, म्हणून निर्मात्यांनी ‘AA22-A6’ हा हॅशटॅग देखील शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘एका ऐतिहासिक सिनेमॅटिक कार्यक्रमासाठी सज्ज व्हा.’ AA22xA6 – सन पिक्चर्सची एक अद्भुत कलाकृती.’ असं लिहिले आहे. व्हिडिओमध्ये, ‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुन चेन्नईतील प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसकडे जाताना दिसत आहे जिथे तो दिग्दर्शक अ‍ॅटली आणि निर्माते कलानिधी मारन यांना भेटतो. हे तिघेही प्रकल्पावर चर्चा करताना आणि अधिकृतपणे प्रोजेक्ट लॉक करताना दिसत आहेत.

 

Gear up for the Landmark Cinematic Event⚡✨#AA22xA6 – A Magnum Opus from Sun Pictures💥@alluarjun @Atlee_dir #SunPictures #AA22 #A6 pic.twitter.com/MUD2hVXYDP

— Sun Pictures (@sunpictures) April 8, 2025

तांत्रिक तज्ञांची टीमसह करणार काम
व्हिडिओमध्ये लॉस एंजेलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओला त्यांची भेट देखील दाखवण्यात आली आहे, जिथे ते हॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध तांत्रिक तज्ञांच्या मदतीने पटकथेवर काम करत आहेत. यामध्ये आयर्नहेड स्टुडिओचे सीईओ आणि कला दिग्दर्शक जोस फर्नांडिस यांचा समावेश आहे, जे स्पायडर-मॅन: होमकमिंग, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर आणि अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन या चित्रपटांसाठी ओळखले जातात आणि जेम्स मॅडिगन, एक व्हीएफएक्स पर्यवेक्षक ज्यांनी जीआय जो: रिटॅलिएशन आणि आयर्न मॅन २ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हॉलिवूडमधील इतर अनेक टॉप तंत्रज्ञ देखील या प्रकल्पात सहकार्य करताना दिसत आहेत.

‘L2 Empuran’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट, फक्त नऊ दिवसांत बनवला रेकॉर्ड!

अ‍ॅटलीने व्यक्त केला आनंद
आपला उत्साह व्यक्त करताना अ‍ॅटली म्हणाला, ‘हा असा चित्रपट आहे जो मी नेहमीच बनवण्याचे स्वप्न पाहत होतो. ज्यावर मी खरोखर विश्वास ठेवला होता अशा स्क्रिप्टला साकारण्यासाठी वर्षानुवर्षे लागली. आता सन पिक्चर्समधील कलानिधी मारन सरांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आयकॉन स्टार अल्लू अर्जुन सर यांच्यासोबत ते प्रत्यक्षात आणणे हे स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नाही. हा चित्रपट मुळातच भव्य आहे आणि त्याची कथा जादुई आहे, जी सर्वत्र प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.’ असं तो म्हणाला आहे.

Web Title: Allu arjun new film announced with atlee titled aa22 a6 on actor 43rd birthday produce by sun pictures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Allu Arjun

संबंधित बातम्या

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
1

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
2

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा
3

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!
4

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.