कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला शाहरुख खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान यांनी आता बांद्राचा ‘मन्नत’ बंगला सोडला आहे. मुंबईच्या पाली हिल भागामध्ये असलेल्या एका नवीन घरात ते शिफ्ट झाले आहेत. कारण की, शाहरुख खानचे जुने घर ‘मन्नत’चे रिनोव्हेशनचे काम सुरु आहे. या रिनोव्हेशनच्या कामाला दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेलिब्रिटीच्या फॅमिलीने नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. पापाराझींनी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीसह सुहाना खानला नव्या घरात एन्ट्री करताना कॅमेऱ्यात कैद केले आहे.
रिअल इस्टेटची माहिती देणाऱ्या झॅप्की (Zapkey)या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने विकत घेतले आहे. त्याचे भाडे वर्षाला २.९ कोटी इतके आहे. हे चार मजल्याचे घर असून त्या घराचे महिन्याला २४ लाख रुपये भाडं आहे. अभिनेत्याने भाड्याने घेतलेलं घर पूजा कासा नावाच्या बिल्डिंगीत आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने घेतलेले नवीन घर बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानीचे आहे. खरंतर, जॅकीची बहिण दिपशिखा देशमुख आणि तिचे वडील वाशु भगनानी यांच्या मालकीची ही बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगीचे नाव जॅकी आणि दिपशिखाची आई पूजा यांच्या नावावरून आहे.
‘चेटकिणीसारखे हास्य’ या विधानानंतर अमर कौशिक आणि श्रद्धा कपूर आले समोरासमोर, काय म्हणाली अभिनेत्री?
शाहरूखने सध्या भाड्याने घेतलेलं घर मुंबईतल्या एका अलिशान भागात असलं तरीही ते ‘मन्नत’च्या तुलनेत आकाराने लहान आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डुप्लेक्स अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ १०, ५०० चौरस फुट इतके आहे. जे मन्नतच्या २७,७०० चौरस फुटच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. या अपार्टमेंटमध्ये शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचे सुरक्षारक्षक आणि कर्मचारी देखील राहतील. एका सूत्राने वेबसाइटला सांगितले की, “ते निश्चितच मन्नतइतके मोठे नाही, परंतु त्यात त्याच्या सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी जागा आहे.” शाहरुख खानचे नवीन शेजारी कोण असेल ? असा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडला आहे.
मोठ्या अपघातात कसा वाचला सोनालीचा जीव? अभिनेता सोनू सूदने २ आठवड्यांनंतर केला खुलासा!
शाहरुखने भगनानी कुटुंबाकडून अपार्टमेंट भाड्याने घेतले असल्याने, ते त्याचे शेजारी देखील असतील कारण ते संपूर्ण इमारतीचे मालक आहेत आणि तिथेच राहतात. जॅकी भगनानी, त्याची पत्नी रकुल प्रीत सिंग, वाशू भगनानी आणि पूजा भगनानी एकाच इमारतीत राहतात आणि ते खानचे शेजारी असतील. दिलीप कुमारचा बंगला शाहरुखच्या तात्पुरत्या घरासमोर आहे. दिलीप कुमार व्यतिरिक्त, संजय दत्तचे घर आणि कपूर कुटुंबाचा प्रतिष्ठित बंगला देखील याच परिसरात आहे.