(फोटो सौजन्य - अकाउंट)
पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित मल्याळम सुपरस्टार मोहनलालचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘एल २ एम्पुरान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आता हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ याला मागे टाकले आहे. आणि स्वतःचे अव्वल स्थान निर्माण केले आहे.
‘मंजुम्मेल बॉईज’ चित्रपटाला टाकले मागे
बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार, मोहनलालच्या ‘एल २ एम्पूरान’ने आतापर्यंत जगभरात २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यासह, हा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट बनला आहे आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये चांगला चालत आहे. यापूर्वी चिदंबरम दिग्दर्शित ‘मंजुम्मेल बॉईज’ या चित्रपटाने जगभरात एकूण २४१ कोटी रुपये कमावले होते. ज्याला ‘L2 Empuran’ ने रिलीजच्या फक्त नऊ दिवसांत मागे टाकले आहे.
मोठ्या अपघातात कसा वाचला सोनालीचा जीव? अभिनेता सोनू सूदने २ आठवड्यांनंतर केला खुलासा!
भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट
एवढेच नाही तर मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा ‘एल २ एम्पुरान’ हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘L2 Empuran’ ने आतापर्यंत भारतात १०६ कोटी रुपये कमावले आहेत. आता, फक्त ‘अदुजिविथम’ (१६७.५० कोटी रुपये) आणि ‘२०१८’ (११०.५० कोटी रुपये) हे चित्रपट देखील त्याच्या पुढे आहेत. ‘L2 Empuran’ ज्या वेगाने थिएटरमध्ये सुरू आहे, त्यामुळे हा चित्रपट लवकरच ‘२०१८’ लाही मागे टाकेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, ‘एल २ एम्पुरन’ या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापुढे फक्त विकी कौशलचा ‘छावा’ आणि अभिनेता वेंकटेशचा ‘संक्रातीकी वास्तुनम’ हा चित्रपट आहे.
हा चित्रपट वादांनीही वेढला गेला होता
पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘L 2 Empuraan’ देखील वादात सापडला आहे. तथापि, याचा चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याशिवाय या चित्रपटात मंजू वॉरियर, सूरज वासुदेवन आणि टोविनो थॉमस यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच चित्रपट सिनेमागृहात चांगली कमाई करत आहे.