(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनने मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रेमाबद्दल त्यांनी आभारही मानले. अभिनेता घरी परल्यानंतर त्याच्या घरच्यांना आणि मुलांना खूप आनंद झाला आहे. अभिनेत्याने प्रसार माध्यमांशी नेमकं काय संवाद साधला जाणून घेऊयात.
असे अल्लू अर्जुन यांनी सांगितले
अल्लू अर्जुन म्हणाला की, मी कुटुंबाची माफी मागतो. हा सगळा अपघात होता. ते संपूर्ण कुटूंब माझा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात आले होते. सगळी घटना ही बाहेर घडली आहे. या घटनेचा माझा थेट संबंध नाही. मी पूर्णपणे महिलेच्या कुटुंबासोबत आहे, मी त्यांना शक्य ती मदत करेन.’ असे अभिनेत्याने सांगितले.
#WATCH | Hyderabad | Actor Allu Arjun says, “…We are extremely sorry for the family. I will personally be there to help them in whatever way possible. I was inside the theatre watching a movie with my family and the accident happened outside. It has no direct connection with me.… pic.twitter.com/CJxd2JMxVK
— ANI (@ANI) December 14, 2024
मी 20 वर्षांपासून थिएटरमध्ये जात आहे
अभिनेता अल्लू अर्जुन पुढे म्हणाला की, ‘गेल्या 20 वर्षांत मी 30 पेक्षा जास्त वेळा त्या सिनेमागृहाला भेट दिली आहे. असे आजपर्यंत कधीच घडले नाही. हे पूर्णपणे दुर्दैवाने घडले आहे. या घटनेबद्दल मला खूप दु:ख झाले आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले.
अल्लू अर्जुनच्या वडिलांनी व्यक्त केले मत
अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनीही मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘बनीच्या (अल्लू अर्जुन) चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण मीडियाचे मी आभार मानतो. याशिवाय तुम्ही त्याच्या कालच्या घटनेचे समर्थन करत आहात.’ असे ते म्हणाले.
12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, “मी पूर्णपणे थकलोय…”
अल्लू अर्जुनने मीडियासह साधला संवाद
तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन घरी येऊन मीडियाशी बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संवादात त्याने चाहत्यांचे आभार मानले. जे काही घडले त्याबद्दल माफी मागतो असे देखील अभिनेत्याने म्हंटले आहे. तसेच महिलेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे.