12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, "मी पूर्णपणे थकलोय..."
‘12th फेल’ फेम बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत २ डिसेंबरला पोस्ट शेअर करत अभिनयातून निवृत्ती असल्याचे संकेत दिले होते. अभिनेत्याने करियरच्या शिखरावर असताना इतकाचा टोकाचा निर्णय का घेतला ? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने एका मुलाखतीतून दिले आहे. ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने करियर इतक्या टर्निंग पॉईंटवर असताना महत्वाचा निर्णय घेतला ? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता विक्रांत मेस्सीने सांगितले की, “या गोष्टीचा मी माझ्या जीवनात केव्हाच विचार केला नव्हता. 12th Fail चित्रपट केल्यानंतर सर्वत्र माझ्या कामाचे कौतुक करण्यात आले. मला आयुष्यात एकदा तरी फिल्मफेअर मिळवण्याचे माझे स्वप्न होते, तेही मला मिळाले.” मुलाखती दरम्यान पुढे विक्रांत म्हणाला की, “एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या व्यक्तीची देशाच्या पतंप्रधानांसोबत भेट होणे शिवाय पंतप्रधानांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्र बसून आपला चित्रपट पाहणं ही फार मोठी गोष्ट आहे.”
पुढे मुलाखती दरम्यान विक्रांतने त्याच्या करिअरचा त्याच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांवर भाष्य केलं. त्यावेळी विक्रांत म्हणाला, “शारिरीकदृष्ट्या मी पूर्णपणे थकलो आहे. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना सगळ्याच गोष्टीचं संतुलन राखणं मला अवघड जातं आहे.” त्यानंतर अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं. “मी त्या पोस्टमध्ये जरा जास्तच इंग्रजी लिहिली होती. त्यामुळे प्रत्येकाला मी नक्की काय लिहिलंय हे समजलं नाही.” इंग्रजीत लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे काही गोंधळ निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
विक्रांत मेस्सीच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याने आपल्या फिल्मी करियरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ’12th Fail’,’द साबरमती रिपोर्ट’, ‘कार्गो’ आणि ‘ए डेथ इन द गंज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला.