
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अॅमेझॉनची विनामूल्य व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा एमएक्स प्लेयरने उद्योजकांसाठी नव्या रियलिटी सिरीज ‘भारत के सुपर फाउंडर्स’ चा ट्रेलर आज रिलीज केला आहे. ही सिरीज उद्योजकांची क्षमता, त्यांची कल्पना आणि निर्णय घेण्याची तयारी तपासेल. 16 जानेवारी 2026 पासून ही मालिका फ्रीमध्ये एमएक्स प्लेयरवर पाहता येणार आहे.
सिरीजमध्ये मार्गदर्शक आणि होस्ट म्हणून सुनील शेट्टी दिसणार आहेत. भारतातील आगामी उद्योजकांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी म्हणून उद्योगपतींच्या एका प्रतिष्ठित पॅनेलने सहभागी होणार आहे. सिरीजची निर्मिती रस्क मीडिया आणि रिकर क्लब यांनी केली असून, स्टॉकग्रो, लेगसी कलेक्टिव्ह, वनप्लस पॅड 3 आणि बॉलर्स यांसारख्या कंपन्यांचा प्रायोजकांचा सहभाग आहे.
या सिरीजमध्ये भारतातील लहान शहरांतील आणि नवीन बाजारपेठेतील उद्योजकांची कल्पना आणि मेहनत दिसेल. संस्थापक आपले व्यवसाय स्पष्टता, धैर्य आणि जोखीम पत्करण्याच्या क्षमतेसह सादर करतील. ट्रेलरमध्ये 100 कोटींच्या गुंतवणुकीवरही लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे ही मालिका भारतातील सर्वात मोठी उद्योजक रियलिटी सिरीज ठरली आहे.
सिरीजबाबत बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, “यश हे सातत्यातून येते, शॉर्टकटमधून नाही यावर माझा विश्वास आहे. ‘भारत के सुपरफाऊंडर्स” चा अर्थ हाच आहे. हा सगळा खेळ काम करणे, अपयश, शिकणे आणि पुन्हा उठून उभे राहण्याबद्दल आहे. खऱ्या कल्पनांना गांभीर्याने घेतले जाते आणि खऱ्या भांडवलाचा आधार दिला जातो. अशा ठिकाणी आगामी संस्थापक म्हणजे फाऊंडर्सना मार्गदर्शन करण्याला मी खरोखर महत्त्व देतो.”
उद्योगपती डॉ. ए. वेलूमणि म्हणाले, “ही सिरीज व्यवसाय उभारण्याचे वास्तविक आव्हान दाखवते, जोखीम आणि दबावाचा सामना करणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन करते.” नितीश मित्तरसैन म्हणाले, “खऱ्या उद्योजकतेसाठी धैर्य, जोखीम पत्करणे आणि जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक आहे. या सिरीजमुळे उद्योजकांना त्यांच्या कल्पना पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.”
‘भारत के सुपर फाउंडर्स’ 16 जानेवारी 2026 पासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विशेष स्ट्रिम होईल. जे एमएक्स प्लेयर अॅपद्वारे मोबाईल आणि कनेक्टेड टीव्हीवर, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्सट्रीमवर उपलब्ध असेल.