(फोटो सौजन्य - अकाउंट)
नुकताच अक्षय कुमारच्या आगामी ‘केसरी २’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये अनन्या पांडे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची भूमिका जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा ट्रेलर अनन्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या लोकांमध्ये एका खास व्यक्तीचाही समावेश होता, ज्याने अनन्याच्या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता. अनन्या पांडेचा या व्यक्तीशी काय संबंध आहे आणि ही व्यक्ती कोण आहे आपण जाणून घेणार आहोत.
‘मलाही आधाराची गरज…’, ‘सिकंदर’च्या रिलीज दरम्यान सलमान खान असं का म्हणाला?
‘केसरी २’ बद्दल वॉकर ब्लँको उत्साहित दिसला
‘केसरी २’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या प्रतिक्रियांमध्ये अक्षय कुमार आणि आर माधवन यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. अनन्या पांडेचेही कौतुक झाले आहे. या चित्रपटात अनन्या एका वकिलाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कथा जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाची आहे. वॉकर ब्लँकोने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘केसरी २’ चित्रपटाचा ट्रेलरही पोस्ट केला आहे. तसेच, अनन्याचा साडी नेसलेला एक फोटोही शेअर केला आहे.
अनन्याचा वॉकर ब्लँकोशी काय संबंध?
प्रश्न असा आहे की वॉकर ब्लँकोचा अनन्या पांडेशी काय संबंध आहे. गेल्या काही काळापासून अनन्या आणि वॉकर ब्लँको डेटिंग करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनन्या पांडेने अद्याप हे नाते उघडपणे स्वीकारलेले नाही पण ती अनेकदा वॉकर ब्लँकोसोबत दिसते. तसेच अनेक वेळा वॉकर ब्लँकोच्या पोस्टवर अभिनेत्री कंमेंट करताना देखील दिसत असते.
‘Karate Kid-Legends’च्या नवीन ट्रेलरने केला कल्ला, वयाच्या ७० व्या वर्षी जॅकी चॅनची जबरदस्त भूमिका!
वॉकर ब्लँको काय करतो?
सध्या, वॉकर ब्लँको अंबानी कुटुंबाच्या प्राणी निवारा वांताराशी जोडलेला आहे. वॉकरच्या इंस्टाग्राम पेजवर प्राण्यांसोबतचे व्हँटाराचे असंख्य फोटो आहेत. याशिवाय त्याने मॉडेलिंगच्या जगातही काम केले आहे. असे म्हटले जाते की अनन्या आणि वॉकर ब्लँको यांची भेट अंबानी कुटुंबाच्या लग्नात झाली होती. आणि या नंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरू लागल्या.